शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मेहुण्याचा खून; भावजीला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 03:26 IST

प्रेमविवाहाला विरोध करणाऱ्या मेहुण्याचा चाकूने वार करून खून

पुणे : प्रेमविवाहाला विरोध करणाऱ्या मेहुण्याचा चाकूने वार करून खून करणाºया भावजीला जन्मठेप आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी हा आदेश दिला आहे.अलोक किशोर कांबळे (वय २८, रा. आंबेडकर सोसायटी, येरवडा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने मेहुणा निखिल बाळू कदम (वय २४, रा. येरवडा) याचा १४ डिसेंबर २०१४ साली रोजी रात्री दहाच्या सुमारास येरवडा येथील आंबेडकर सोसायटी परिसरातील व्यायाम शाळेसमोर खून केला होता. निखिल याचे वडील बाळू वकील कदम (वय ५२) यांनी याबाबत येरवडा पोलिसात फिर्याद दिली आहे.या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील सुरेश गवळी यांनी काम पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी रोहित गवळी याची साक्ष महत्त्वाची ठरली. येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश भोसले, कॉन्स्टेबल सुधीर चिकणे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी सहाय केले.अलोक याने निखिलची बहिण नेहा हिच्याशी प्रेम विवाह केला होता. त्यास मयत निखिल आणि फियार्दी बाळू यांचा विरोध होता. याच कारणावरून निखिल याने अलोक याच्यावर २०१३ मध्ये वार केले होते. घटनेच्या दिवशी निखिल आणि अलोक एका वरातीमध्ये होते. निखिल मित्रांसह गप्पा मारत होता. त्यावेळी जुन्या भांडणाच्या रागातून अलोक याने निखिल याच्यावर चाकुने वार करून त्याचा खून केला. प्रत्यक्षदर्शी रोहित याने निखिल याला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हातावर चाकू लागून तो जखमी झाला होता.

टॅग्स :MurderखूनPuneपुणे