शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मावसभावानेच केला बहिणीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:33 IST

मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथे मावसभावाने अल्पवयीन मावसबहिणीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही मुलगी प्रसूत होऊन तिला मुलगा झाला आहे.

मंचर : मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथे मावसभावाने अल्पवयीन मावसबहिणीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही मुलगी प्रसूत होऊन तिला मुलगा झाला आहे. याप्रकरणी मावसभावाच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात बलात्कार व बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.मूळ जवळे (ता. पारनेर) येथील ठाकर समाजातील कुटुंब मजुरीसाठी मेंगडेवाडी येथे आले होते. संबंधित कुटुंबप्रमुखाची अल्पवयीन मुलगी २ वर्षांपूर्वी मेंगडेवाडी येथे तिच्या वडिलांकडे राहण्यास आली. तिचा मावसभाऊसुद्धा ५ वर्षांपासून मेंगडेवाडी येथे राहत होता. २० जुलैला या मुलीच्या पोटात अचानक दुखू लागले.पहाटे ५ वाजता या मुलीला मोटारसायकलवरून मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. डॉक्टरांनी तिला तपासले असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सकाळी ही मुलगी प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. चौकशी केली असता मावसभावाने वारंवार बलात्कार केल्याने ती गर्भवती राहिल्याची माहिती या अल्पवयीन मुलीने कुटुंबीयांना दिली.घरातील जवळचे प्रकरण असल्यामुळे या कुटुंबाने तक्रार न देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. संबंधित मुलीने माझी कोणाविरुद्ध काहीएक तक्रार नाही, असा लेखी जबाब पोलिसांना दिला. अल्पवयीन मुलीच्या मुलाला ससून रुग्णालयात ठेवण्यात आले, तर मुलीला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. महिला पोलीस कर्मचारी या मुलीला महिला बालकल्याण समिती शिवाजीनगर पुणे येथे घेऊन गेल्यानंतर तिची चौकशी केली असता या मुलीने झालेली आपबीती सांगितली. त्यानंतर महिला बालकल्याण समितीने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले.यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. मावसभावानेच राहत्या घरी मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याने ती गरोदर राहिली. तिचे बाळंतपणाचे दिवस पूर्ण झाल्याने तिने अपत्यास जन्म दिला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे अधिक तपास करीत आहेत.त्या अल्पवयीन मुलीला वढू येथील माहेर संस्थेत दाखल करण्यात आले आहे, तर अपत्यास आळंदी येथील शिशुगृहात ठेवले आहे. आरोपीला आज न् यायालयात हजर केले असता त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हाnewsबातम्या