शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हेलिकॉप्टरचा भाग पडून छताला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 04:26 IST

आकाशातून जात असलेल्या हेलिकॉप्टरमधून निखळलेला पत्रा थेट एका घरावर पडून छताला भगदाड पडल्याची घटना हडपसर येथील रामटेकडी झोपडपट्टीमध्ये मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे/हडपसर : आकाशातून जात असलेल्या हेलिकॉप्टरमधून निखळलेला पत्रा थेट एका घरावर पडून छताला भगदाड पडल्याची घटना हडपसर येथील रामटेकडी झोपडपट्टीमध्ये मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. घराच्या पत्र्यावर पडलेली आठ इंचाची लोखंडी वस्तू थेट पोटमाळ्यावर पडून छताला भेदून जात सर्वांत खालच्या खोलीत पडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी रामटेकडी झोपडपट्टीवरून एक हेलिकॉप्टर जात होते. या हेलिकॉप्टरमधून हिरव्या रंगाची आणि अर्धगोलाकार आकाराची चपटी लोखंडी वस्तू खाली पडली. प्रचंड वेगात खाली आलेला पाच ते सहा किलोचा हा पत्रा जॉर्ज फ्रान्सिंस यांच्या घराच्या छताच्या पत्र्यावर पडला. हे घर लोड बेअरिंगचे आहे. त्यामुळे छतावर असलेल्या पत्र्याला भगदाड पडले. या भगदाडामधून ही वस्तू थेट सर्वांत खालच्या खोलीमध्ये जाऊन पडली. जोरात आवाज झाल्याने घरातील माणसे बाहेर आली. स्वयंपाकघर असलेल्या या खोलीत सुदैवाने कोणीही नव्हते. स्थानिकांनी लष्कराचे हेलिकॉप्टर असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. हडपसर, मुंढवा या भागातील एमआयडीसी परिसरात बड्या कंपन्या आहेत. यासोबतच लष्कराचा मोठा भाग आहे. येथील काही उद्योजक हेलिकॉप्टरचा नेहमी वापर करतात. तसेच लष्कराच्या हेलिकॉप्टरचीही वर्दळ असते. त्यामुळे हे हेलिकॉप्टर नेमके कोणाचे होते याबाबत स्पष्टपणे सांगता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपास वानवडी पोलिसांनी सुरू केला असून, घराचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.