शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत अतिक्रमण कारवाईचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 02:28 IST

बारामती शहरात रुई पाटी ते पंचायत समितीपर्यंत आज अचानक सकाळपासून अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत रस्त्यालगत लावलेले दुकानांचे फलक, होर्डिंग, हातगाड्या, टपऱ्या आदींवर कारवाई करण्यात आली. वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉलदेखील उचलण्यात आल्याने बारामतीतील वृत्तपत्र विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली.

 बारामती : बारामती शहरात रुई पाटी ते पंचायत समितीपर्यंत आज अचानक सकाळपासून अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत रस्त्यालगत लावलेले दुकानांचे फलक, होर्डिंग, हातगाड्या, टपऱ्या आदींवर कारवाई करण्यात आली. वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉलदेखील उचलण्यात आल्याने बारामतीतील वृत्तपत्र विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली. तर, अचानक केलेल्या या कारवाईमुळे छोट्या व्यावसायिकांची धांदल उडाली.प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार हनुमंत पाटील, मुख्याधिकारी मंगेश चितळे, पोलीस निरीक्षक विजय जाधव, बारामती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुरेशसिंह गौड, नगरपालिकेचे बांधकाम अभियंता जीवन केंजळे, रत्नरंजन गायकवाड, आर. पी. शहा, पाणीपुरवठ्याचे विजय सूर्यवंशी, अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुनिल धुमाळ, आरोग्य अधिकारी सुभाष नारखेडे, आरोग्य अधिकारी राजेंद्र सोनवणे, अजय लालबिगे, अतिक्रमण आणि अरोग्य विभागाचे कर्मचाºयांनी ही मोहीम राबविली.बारामती शहराच्या नव्या, जुन्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. अचानक केलेल्या कारवाईमुळे व्यावसायिकांनी नाराजी, संताप व्यक्त केला. या अतिक्रमण मोहिमेत वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉल देखील काढण्यात आले. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली. संघटनेचे अध्यक्ष विजय सणस यांनी सांगितले की, वृत्तपत्रांचे स्टॉल फक्त सकाळी असतात. त्या ठिकाणी गर्दी नसते. त्यामुळे या स्टॉलवर कारवाई करणे योग्य नाही.प्रशासनाचे लक्ष फक्त भिगवण रस्त्यावरच...मागील अनेक वर्षांपासून प्रशासन भिगवण रस्त्यावरच विशेष लक्ष देते. आज देखील अतिक्रमण कारवाई करताना रुई पाटी ते पंचायत समितीपर्यंत कारवाई केली. भिगवण रस्त्याचे पदपथ, सेवा रस्ता, फुटपाथ, झाडांचे संगोपन आदींच्या बाबतीत या रस्त्यालाच फार महत्त्व दिले जाते. अतिक्रमण मोहीम राबविताना किमान स्टॉल धारकांना अगोदर सुचित केले असते तर त्यांचे नुकसान झाले नसते.पुन्हा हॉकर्स झोनचा प्रश्न ऐरणीवर....सध्या बेरोजगारीचा भेडसावत आहे. त्यामुळे अनेक तरुणांनी छोटे, मोठे व्यवसाय सुरू केले आहेत. नगरपालिकेने हॉकर्स झोन करून त्यांना हक्काची जागा देण्याची गरज आहे. राज्य शासनाचे तसे आदेश आहेत. परंतु, दोन वर्षांपूर्वी फक्त सर्वे करण्यात आला. हॉकर्स झोनची अंमलबजावणी फक्त कागदावरच आहे. त्यामुळे अतिक्रमण अगदी रस्त्यावर आले. तेव्हा कारवाई सुरू करण्यात आली. नगरपालिका प्रशासनाने हॉकर्स झोनचा प्रश्न देखील तातडीने सोडवावा, अशी मागणी छोट्या व्यावसायिकांमधून होत आहे.टपऱ्या काढल्या... अनधिकृत बांधकाम जैसे थे...याच रस्त्याच्या परिसरात अनाधिकृत बांधकामाच्या बाबतीत मागील महिन्यात तक्रार करण्यात आली होती. वृत्तपत्रांमध्ये त्याचे बातमी प्रसिद्ध झाली. मागील त्या बांधकामाला नगरपालिकेकडून अभय देण्यात आले. केवळ पोलिसात तक्रार केली. संबंधित मालकाने बांधकाम पूर्ण केले. टोलेजंग इमारत अगदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर बांधण्यात आली. अतिक्रमण काढताना या सर्वावरच कारवाई करावी, अशी देखील मागणी होत आहे. सेवा रस्त्याला लागून देखील गाळे काढण्यात आले आहेत. हीच परिस्थिती रिंगरोडला आहे. सध्या भरत असलेल्या मंडईच्या समोर असलेल्या इमारतीच्या पाठीमागच्या बाजुला चक्क पक्के गाळे फुटपाथला लागून काढण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकची कोंडी होती.