शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
4
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
5
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
6
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
7
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
8
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
9
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
10
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
11
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
12
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
13
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
14
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
15
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
16
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
17
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
18
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
19
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
20
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

उजनी जलाशयात वाळूसम्राटांवर धाडसी कारवाई

By admin | Updated: October 9, 2016 04:25 IST

इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक सजन हंकारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.७)मध्यरात्रीपासून उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील

इंदापूर : इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक सजन हंकारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.७)मध्यरात्रीपासून उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील शहा गावातील अवैध वाळूउपश्यावर एकोणीस तासांची धडक कारवाई केली. १४ फायबर व यांत्रिक बोटींना जलसमाधी दिली. वाळूचे मोठे सात साठे जेसीबीने नदीपात्रात लोटले. या कारवाईच्या निमित्ताने बोटींचे सुमारे ७० लाख रुपयांचे, त्यामधील दोन लाख रुपयांहून अधिक किमतीच्या ८४ ब्रास वाळूचे आणि सात वाळूसाठ्यांचे असे मिळून वाळूमाफियांचे एक कोटी रुपयांचे नुकसान करण्यात आले. हे वाळू शोधून काढण्यासाठी वाळूउपसा करणाऱ्या पाच परप्रांतीय कामगारांनाच त्यांनी सोबत घेतले होते. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तरीदेखील इंदापूर तालुक्यातील शहा गावाच्या परिसरात रात्रीच्या वेळी अवैध वाळूउपसा केला जातो, याची माहिती मिळाली होती. मध्यरात्रीच त्यांनी पोलीस अधिकारी, वनअधिकारी, तसेच पोलीस व महसूल पथकासह कारवाईसाठी वाळू उपशाच्या जागा हेरल्या. पहाटेपासून ते आज रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू ठेवण्यात आली. शहा गावातील उजनी जलाशयात जवळपास ४ ते ५ किलोमीटर अंतर आतमध्ये जाऊन रात्रीच्या वेळी वाळूसम्राटांच्या वाळूउपशाच्या अड्ड्यांमध्ये घूसून कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली. या कारवाईत तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक सजन हंकारे, वनपाल पी. डी. चौधरी, सहायक फौजदार राजेंद्र पाटोळे, पोलीस कर्मचारी विजय झारगड, जी. एस. चौधर, प्रशांत राखुंडे, सुशांत तारळेकर, आमीर मुलाणी, वनविभागाचे कर्मचारी एच. जी. बागल, बाळू वाघमोडे, सुभाष काळेल, तुकाराम देवकर आदींनी या कारवाईत भाग घेतला. यापूर्वी बोटींचा स्फोट घडवून आणला जात होता. आता जलसमाधीच दिल्याने वाळूसम्राटांना हादरा बसला आहे. (वार्ताहर)कारवाईमध्ये सातत्य ठेवणार: श्रीकांत पाटील यासंदर्भात इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी सांगितले, की वाळूसम्राटांनी परप्रांतीयांना बोटीवर चालक म्हणून घेतले आहे. त्यांनाच बरोबर घेऊन जवळपास १४ बोटी उजनी जलाशयाच्या पात्रात बुडवल्या. त्याचबरोबर त्यांनी उपसा केलेला वाळूसाठा नष्ट केला आहे. तसेच ७ वाळू साठ्यांमध्ये माती मिसळण्यात आली आहे. वाळूसम्राट रात्रीच्या वेळीच मोठ्या प्रमाणात वाळू उपसतात, त्यामुळे रात्रीच कारवाई केली. यापुढे यामध्ये सातत्य राहणार आहे.