शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
6
वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
7
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
8
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
9
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
10
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
11
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
12
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
13
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
14
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
15
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
16
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
17
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
18
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
19
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
20
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती

बाप्पांच्या निरोपाची जय्यत तयारी

By admin | Updated: September 14, 2016 03:58 IST

दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन परतीच्या मार्गावर निघालेल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी मानाच्या गणपतींसह शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली आहे.

पुणे : दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन परतीच्या मार्गावर निघालेल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी मानाच्या गणपतींसह शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. ढोल -ताशा आणि टाळ-मृदग्ाांच्या गजरापासून पांरपरिक ब्रास बँडसह वैभवशाली मिरवणूक निघणार आहे. यंदाच्या वर्षी प्रथमच स्वराज्याच्या सिंहगर्जनेपासून ते विठूरायाच्या भक्ती पर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अग्राहून सुटके पर्यंत तसेच विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणा-या जीवतं देखाव्यांच्या रथांनी शहरातील मानाच्या गणपतीची मिरवणूक या वर्षीचे विशेष आकर्षण ठरणार आहे. कसबा गणपती : कसबा गणपती मंडळातर्फे गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गुरुवारी सकाळी ८.३० वाजता उत्सव मंडपातून श्रींचे प्रस्थान होईल. त्यानंतर टिळक चौकामध्ये महापौर प्रशांत जगताप, पालकमंत्री गिरीश बापट, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, महापालिका आयुक्त कुणाल कुमार आदी मान्यवरांच्या हस्ते पूजा होऊन साधारणपणे १०.३० वाजता मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. रमणबाग, शिववर्धन, कलावंत ही ढोल-ताशा पथके कसबा गणपती मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी असतील. प्रभात ब्रास बँड, कामायनी विद्यामंदिरचे पथक हेही मिरवणुकीचे वैशिष्ट्य असेल. पारंपरिक पद्धतीने चांदीच्या पालखीतून गणरायाचे विसर्जन होणार आहे, अशी माहिती मंडळाचे पदाधिकारी अनिल पानसे, नीलेश वकील, भूषण गुप्ते यांनी दिली. तुळशीबाग : तुळशीबाग मंडळातर्फे सकाळी ९ वाजता उत्सव मंडपातून श्रींचे प्रस्थान होईल. लोणकर बंधूंचे नगारावादन हे मिरवणुकीचे वैशिष्ट्य असेल. मिरवणुकीमध्ये पुणे डॉक्टर असोसिएशनचे पथक सामाजिक संदेश, जनजागृतीसाठी सहभागी होणार आहे. त्यानंतर कल्पतरू पथकामध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी सामाजिक प्रबोधनपर संदेश देणार आहेत. स्वरूपवर्धिनी शाळेच्या पथकाचाही समावेश असणार आहे. गजलक्ष्मी, हिंद तरुण ढोल पथकांचा गजरही मिरवणुकीत निनादणार आहे. सरपालेबंधूंनी तयार केलेल्या फुलांच्या रथातून गणरायांचे प्रस्थान होणार आहे, अशी माहिती नितीन पंडित यांनी दिली.त्वष्टा कासार : त्वष्टा कासार मंडळातर्फे या वर्षी लोकमान्य टिळकांची ’स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!’ या घोषणेची शताब्दी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती यांचे औचित्य साधणारा देखावा यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण ठरणार आहे. चित्रफलकावर अखंड भारताचा नकाशा, देशातील सामाजिक विषयाची चळवळ जागृत ठेवणारी प्रतिके, स्वदेशीअंतर्गत महात्मा व चरखा, साक्षरता-सावित्रीबाई व महात्मा फुले, व्यसनमुक्ती- नरेंद्र दाभोलकर, बेटी बचाओ-आॅलिंपिक पदक विजेत्या रूपेरी सिंधू व शक्तिशाली साक्षी, जलसंवर्धन-राजेंद्र प्रसाद व पुण्यातील गणेश मंडळांनी खडकवासला धरणाचा गाळा काढण्याचा उपक्रम यांचा समावेश करण्यात आला आहे. महिलांचा तिरंगी झेंडा हे मिरवणुकीचे वैशिष्ट्य असेल. याशिवाय मुला-मुलींसाठी फॅँसी डे्रस स्पर्धा घेण्यात येणार आहे.बाबू गेनूू तरुण मंडळ : बाबू गेनू तरुण मंडळाची विसर्जन मिरवणूक सायंकाळी ७ वा. गणेश आरती झाल्यानंतर निघेल. विसर्जन मिरवणुकीसाठी चित्रपट कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी भव्य रथ साकारला आहे. हा रथ २६ फूट लांब, २६ फूट रूंद व २५ फूट उंचीचा तीन मजली रथ फायबरपासून साकारला आहे. विसर्जन मिरवणूक बाबू गेनू चौक, बेलबाग चौक व पुढे मुख्य मिरवणुकीत सामील होणार आहे. मिरवणुकीत शिवतेज, गजलक्ष्मी, व शिवमुद्रा ही ढोल पथके सहभागी होणार आहेत. दगडूशेठ : दगडूशेठ गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळाने श्री गणनायक रथ साकारला असून, ५० हजार मोतीच्या रंगाचे दिवे रथाला लावले आहेत. सायं. ७ वा. मंडई गणेश मित्र मंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात येणार आहे. नंतर लालबाग चौकातून मंडई गणपतीच्या मागे मिरवणूक निघणार आहे. मिरवणुकीत जय गणेश मानव सेवा रथ हा मंडळाच्या सामाजिक उपक्रमाची माहिती देणारा चित्ररथ असणार आहे. पांचाळेश्वर घाटावर गणेशाचे विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती महेश सूर्यवंशी यांनी दिली. महात्मा फुले मंडई परिसरातील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सकाळी दहा वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते आरती करून या मिरवणुकीची सुरूवात केली जाणार आहे. त्यात प्रामुख्याने मानाच्या पाचही गणपतींच्या मिरवणुकीत ढोल,ताशा, लेझीम आणि रांगोळयांच्या पायघड्यांसह या पथकांचा स्वर घुमणार आहे. तर, रंगबेरंगी फुलांनी सजविलेले रथही या मिरवणुकीचे आकर्षण ठरणार आहेत.