शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जागावाटपानंतर ब्रेकअप

By admin | Updated: January 28, 2017 02:01 IST

भारतीय जनता पक्ष-शिवसेनेची युती होणारच असे गृहीत धरून पुणे जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये दोन्ही पक्षांकडून जागांचे वाटप होऊन उमेदवार प्रचारालादेखील लागले आहेत.

पुणे : भारतीय जनता पक्ष-शिवसेनेची युती होणारच असे गृहीत धरून पुणे जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये दोन्ही पक्षांकडून जागांचे वाटप होऊन उमेदवार प्रचारालादेखील लागले आहेत. परंतु आता ब्रेकअपनंतर दोन्ही पक्षांना काही तालुक्यांमध्ये उमेदवारांची शोधा-शोध करावी लागणार आहे. सध्या पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात मावळ आणि शिरूर तालुका सोडले तर अन्य कोणत्याही तालुक्यात भाजपाची फारशी ताकद नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसनंतर सर्वांधिक १३ जागा शिवसेनेच्या असल्याने जिल्हा परिषदेत विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतदेखील दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित झाले होते. परंतु मुंबईमध्येच दोन्ही पक्षांच्या युती घोडे अडले अन् संपूर्ण राज्यातील युतीला खोडा बसला. जिल्ह्यात शिवसेना-भाजपाची युती तुटल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला तरी जिल्ह्यातील नेते व इच्छुक उमेदवारांची निवडणुकीची गणिते बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही पक्षांनी पक्षाचे प्रामुख्याने शिरूर लोकसभा मतदारसंघातील जागावाटपाबाबत चर्चा होऊन काही जागांवर उमेदवारांना कामाला लागण्यास सांगण्यातदेखील आले आहे. परंतु आता युती तुटल्याने दोन्ही पक्षांना जिल्हा परिषदेच्या ७५ जागा आणि पंचायत समितीच्या १५० जागांवर उमेदवार द्यावे लागणार आहेत. काँगे्रसने यापूर्वीच जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रससोबत आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)