शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

Breaking News : बारामतीत २९ जुलै रोजी होणाऱ्या ओबीसी एल्गार महामोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 16:29 IST

ओबीसी समाजाचा २९ जुलै रोजीचा एल्गार महामोर्चा कोणत्याही परिस्थितीत होणारच : ओबीसी आरक्षण कृती समितीचा दावा

बारामती : बारामती शहरात २९ जुलै रोजी होणाऱ्या ओबीसी एल्गार महामोर्चाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.याबाबत आरक्षण कृती समितीला  नोटीस देण्यात आली आहे.कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही.  आपण कायदेशीर मार्गाने आपल्या मागण्या मान्य कराव्यात .आपण अथवा आपले हस्तकाकडुन कोणताही अनुचित प्रकार झाल्यास तसेच त्यामुळे कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी याबाबत नोटीस दिली आहे.बारामती शहरात मोठया प्रमाणात कोविड बाधित रूग्ण आहेत. तसेच सध्या बारामती शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागु आहे.त्यानुसार विनापरवाना पाच किंवा पाच पेक्षा जास्त इसमांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे.  जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व प्रकारचे सर्व कार्यकम पूर्णत: बंद राहतील अशा स्वरूपाचे आदेश झालेले आहेत. त्या अनुषंगाने रोगाचे वाढीस आळा घालणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर महामोर्चा काढण्यास परवानगी नाकारण्यात येत असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.दरम्यान,  मोर्चासाठी आम्ही स्थानिक प्रशासनाला परवानगी मागितली होती .परंतू आम्हाला ही परवानगी नाकारण्यात आली आहे.  समाजाचा २९ जुलै रोजीचा एल्गार महामोर्चा कोणत्याही परिस्थितीत होणार असल्याचा दावा ओबीसी आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात आला  आहे.

समाजाला एकत्र येऊ दिलं नाही तर राज्यात ही ओबीसी समाज एकत्र यायला अडचण होईल. त्यामुळेच काही शक्ती यामागे प्रशासनाला पुढे करून हा एल्गार मोर्चा हाणून पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.  या मोचार्साठी नाना पटोले, विजय वडेट्टीवर, चंद्रशेखर बावनकुळे, महादेव जानकर, पंकजा मुंडे, राम शिंदे, योगेश टिळेकर, हे ओबीसी नेते कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. आम्ही छगन भुजबळ,  यांना ही निमंत्रित केले आहे.

मोर्चा मध्ये कलमं १४४ चे हनन होत आहे याची आम्हाला जाणीव आहे. परंतू इतर समाजाचे मोर्चे, राजकीय कार्यक्रम चालूच आहे. त्यामुळेच ओबीसी हक्कासाठी उतरत आहे तर त्यांनाच फक्त कोरोनाचे कारण पुढं करून का थांबवलं जातं आहे. ओबीसी हा शांतताप्रिय समाज आहे बारामती मधील हा मोर्चा शांततेत पार पाडेल , अशी आरक्षण कृती समितीला असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.————————————

टॅग्स :BaramatiबारामतीElgar morchaएल्गार मोर्चाOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षणPoliceपोलिस