शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रॅँड पुणे - नेऊ पुढे पुण्याच्या गौरवाचा वारसा, तुम्हीही सहभागी व्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 03:19 IST

पुण्याचा गौरवशाली वारसा कल्पनांचे पंख लावून नवनिर्मितीसाठी भरारी घेत आहे. एक शहर म्हणून पुणे जगभरात आपली ओळख निर्माण करीत आहे.

पुणे : पुण्याचा गौरवशाली वारसा कल्पनांचे पंख लावून नवनिर्मितीसाठी भरारी घेत आहे. एक शहर म्हणून पुणे जगभरात आपली ओळख निर्माण करीत आहे. देदीप्यमान इतिहास, सामाजिक चळवळींनी घडविलेली नवी वाट, शिक्षणाच्या प्रकाशातून ‘आॅक्सफर्ड आॅफ दि ईस्ट’ ही मिळविलेली ओळख, व्यापार-उद्योगांतील कर्तृत्वातून झालेली प्रगती, साहित्य-कला-संस्कृतीच्या जपणूकीतून मिळालेले सांस्कृतिक राजधानीचे बिरुद ते आजचे शांत, सुरक्षित, प्रगतिशील, कॉस्मोपॉलिटन पुणे या सगळ्या प्रवासात सर्वांचाच हातभार लागला आहे. त्याचा सन्मान करण्यासाठी ‘ब्रॅँड पुणे’ ही मोहीम ‘लोकमत’च्या वतीने सुरू करण्यात येणार आहे.वडापाव, मिसळ, बाकरवाडीपासून फॉर्च्यून ५०० मध्ये स्थान मिळविलेल्या उद्योगांनी ‘ब्रॅँड पुणे’साठी आपले योगदान दिले आहे. येथील गणेशोत्सव, संगीतसभा, सांस्कृतिक महोत्सवांचा जागतिक पातळीवर पुणे ब्रॅँड तयार झाला आहे. नेमक्या शब्दांत खूप काही आशय सांगणारी ‘पुणेरी पाटी’ असो की साधी राहणी, उच्च विचारसरणीचा अंगीकार करणारी पुणेरी वृत्ती हेदेखील ‘ब्रॅँड पुणे’ आहेत. इतर शहरांत एकमेकांच्या पक्षकार्यालयांवर हल्ले होतात; पण पुण्यात आपल्या राजकीय विरोधकांचे वाढदिवसही जाहीरपणे साजरी करणारी राजकीय संस्कृती आहे. तोदेखील राजकारणाचा ‘पुणे ब्रॅँड’च. बॅडमिंटनसारखा या मातीतील खेळ जागतिक पातळीवर गेला, वेगवेगळ्या ध्येयांनी पळणाºया सामान्यांनी मॅरेथॉनचे नाव घेऊन क्रीडाक्षेत्रात पुणे ब्रॅँड ठसविला. राज्यभरातील ग्राहकांना आकर्षित करून येथील सराफ व्यावसायिकांनी ‘ज्वेल कॅपिटल आॅफ महाराष्टÑ’ म्हणून पुण्याची नवीन ओळख करून दिली आहे. लक्ष्मी रस्त्यापासून फग्युर्सन रोडपर्यंत वस्त्रप्रावणांची नवी संस्कृती निर्माण केली. बांधकाम व्यावसायिकांनी प्रगतीची शिखरे सर करीत संपूर्ण महाराष्टÑाला ‘रिअर इस्टेट’ दिली. आॅटोमोबाईल उद्योगाच्या प्रगतीने ‘डेट्रॉईट आफ इंडिया’ म्हणून पुणे पुढे येत आहे. पतपुरवठा हे एकमेव धोरण न ठेवता येथील बॅँका, पतसंस्थांनी ‘सोशल बॅँकिंग’ या शब्दाला नवा अर्थ दिला. सामाजिक संवेदनेतून आरोग्याकडे पाहत येथील रुग्णालयांनी नवा आदर्श निर्माण केला. शेकडो ‘इनोव्हेटीव्ह’ तरुणांनी आपल्या कल्पनांनी उद्योगांचा पाया रचला. ‘स्मार्ट’ पुण्याच्या उभारणीत प्रशासकीय पातळीवरील प्रयत्नांना उद्योजक, सामाजिक कार्यकर्त्यांचीही साथ मिळाली.तुम्हीही सहभागी व्हापुण्याच्या शिरपेचात यशाचे अनेक तुरे असताना कधी विनोदातून खिल्ली उडविली जाते. पुण्याची अवहेलना केली जाते. कोतेपणाचे आरोप होतात. वास्तविक गेल्या तीन दशकांच्या काळात सर्वाधिक वेगाने वाढणारे महानगर, म्हणून पुण्याने ओळख मिळविली. शासनदरबाराची नव्हे तर लोकमान्यतेची राजधानी असलेल्या याच शहराने देशामध्ये पहिल्या दहा शहरांमध्ये आवर्जून स्थान मिळविले.अर्थ, उद्योग, क्रीडा, संस्कृतीपासून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटविणारे शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. तीच आणखी गडद आणि बळकट करण्यासाठी ‘लोकमत’ने ही मोहीम सुरू केली आहे. पुण्याच्या विकासातील सगळ्याच शिलेदारांच्या कार्याचा दस्तऐवजच जगासमोर मांडण्याचा मानस आहे. त्यामध्ये आपणही सहभागी व्हा आणि ‘ब्रॅँड पुणे’चा डंका वाजवावा, हीच अपेक्षा.

टॅग्स :Puneपुणे