शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही गटांतील वाद संयोजक मिटवणार

By admin | Updated: December 9, 2015 00:25 IST

अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि प्रकाशकांमध्ये निर्माण झालेले तणावाचे संबंध मिटविण्यासाठी पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजकांनी पुढाकार घेतला आहे

पुणे : अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि प्रकाशकांमध्ये निर्माण झालेले तणावाचे संबंध मिटविण्यासाठी पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजकांनी पुढाकार घेतला आहे. संमेलनातील स्टॉलचे वितरण करण्यापूर्वी प्रकाशक परिषदेचे २ प्रतिनिधी संयोजनात घेऊ, असे आश्वासन देण्यात आले आहे. स्टॉल भाड्याचे दर कमी करण्यासंदर्भात दोन दिवसांत चर्चा होऊन निर्णय घेऊ, असेही सांगण्यात आले आहे.साहित्य संमेलनाच्या स्टॉल उभारणीत मराठी प्रकाशक परिषदेचे २ प्रतिनिधी घेऊ, असे प्रकाशक परिषदेला दिलेले लेखी आश्वासन साहित्य महामंडळाने पाळलेले नाही. लेखी आश्वासनाची पूर्तताही महामंडळाने केली नसल्याने प्रकाशक-विके्रत्यांमध्ये नाराजीची भावना होती. महामंडळ प्रकाशकांना डावलले जात असल्याचे प्रकाशक परिषदेतर्फे सांगण्यात आले. याच पार्श्वभूमीवर, प्रकाशक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची आणि सदस्यांची तातडीची बैठक मंगळवारी सायंकाळी झाली.याविषयी माहिती देताना अनिल कुलकर्णी म्हणाले, की प्रकाशक परिषद आणि विक्रेत्यांना महामंडळ का डावलत आहे, या मुद्द्याला धरूनच चर्चा झाली. महामंडळ पुण्यात आहे. महामंडळाचे पदाधिकारी पुण्यात आहेत, तरीही परिषदेकडे का दुर्लक्ष होत आहे, हे समजले नाही. महामंडळाने परिषदेला पत्र देऊनही त्याची माहिती संयोजकांना दिली नाही, ही बाब समोर आली आहे. बैठकीदरम्यान संयोजन समितीचे प्रतिनिधी सचिन इटकर आले असता त्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. महामंडळाने नियम, अटी सांगितल्या; पण याची माहिती दिली नसल्याचे इटकर म्हणाल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.स्टॉल भाड्यासंर्भातही मुद्दा उपस्थित करण्यात आला. छोट्या विक्रेत्यांना तसेच प्रकाशकांना ५ हजार रुपये परवडणार नाहीत; त्यामुळे भाडे तीन हजार रुपये करावे, अशी विनंती करण्यात आली असता डॉ. पी. डी. पाटील यांच्यासमवेत दोन दिवसांत बैठक घेऊन प्रश्न सोडवू, परिषदेने केलेल्या सर्व सूचनांचा विचार करू, असे आश्वासन इटकर यांनी दिल्याचे ते म्हणाले. स्टॉल भाड्यातून मिळणारे उत्पन्न दुष्काळग्रस्तांना दिले जाणार याचा आम्हाला आनंद आहे; पण छोट्या विक्रेत्यांच्या दृष्टीने विचार व्हावा, अशी विनंती केली असल्याचे ते म्हणाले. बैठकीला अरुण जाखडे, सुनीताराजे पवार, संजय काकडे, अरविंद पाटकर, रमेश कुंदूर, अशोक सातपुते आदी उपस्थित होते.