शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

विमा पॉलिसीवर बोनसच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 02:25 IST

चार कोटी मिळण्याच्या आशेने दीड कोटी गेले; घरही विकण्याची आली वेळ

पुणे : विमा पॉलिसीवर बोनस मिळवून देण्याच्या आमिषाने शिवाजीनगर येथील एका ८४ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाची तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. चार कोटी रुपये मिळविण्याच्या आशेने दीड कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागले. यासाठी त्यांच्यावर आपले मुंबईतील घरही विकण्याची वेळ आली.याप्रकरणी विजय केशव कानिटकर (वय ८४, रा़ ज्ञानेश्वर सोसायटी, मॉडेल कॉलेजवळ, शिवाजीनगर) यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ हा प्रकार २७ मार्च ते १३ नोव्हेंबर २०१८ दरम्यान आॅनलाईनच्या माध्यमातून घडला़ जुन्या विमा पॉलिसीवरील व्याज, लाभ व बोनस असा सर्व मिळून ३ कोटी रुपयांची रक्कम मिळवून देतो, असे सांगून सहा जणांनी कानिटकर यांना तब्बल १ कोटी ५१ लाख ९२ हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी बद्री कैलास, सीताराम केसरी, चतुर्वेदी, अजय शर्मा, प्रीतम घोष आणि कोठारी अशी नावे सांगणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दिल्लीत एका सरकारी कंपनीत कामाला होते़ ते १९८३ मध्ये निवृत्त झाल्यानंतर पुण्यात राहायला आले़ त्यांना मुलगा आहे़ पण ते एकमेकांच्या व्यवहारात दखल देत नाहीत़ त्यांना गेल्या वर्षी मार्च महिन्यात फोन आला़ त्यात जुन्या विमा पॉलिसीवर व्याज मिळवून देतो़ इतक्या वर्षांचे शिल्लक राहिलेले व्याज, लाभ व बोनस असा सर्व मिळून चार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम होईल़ ही रक्कम तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला काही रक्कम भरावी लागेल, असे त्यांना आमिष दाखविण्यात आले़चार कोटी रुपयांहून अधिक पैसे मिळणार, असे वाटल्याने कानिटकर ते सांगतील त्याप्रमाणे वेगवेगळ्या बँकेच्या खात्यांवर पैसे भरत गेले़ त्यासाठी त्यांनी मुंबईतील घर विकून पैसे भरले़ मार्च ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान त्यांनी एकूण १ कोटी ५१ लाख ९२ हजार ४०० रुपये भरले़ तरीही पैसे न मिळाल्याने शेवटी त्यांनी ही बाब मुलाला सांगितली़ तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले़ त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार अर्ज केला़ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे अधिक तपास करीत आहेत़

टॅग्स :fraudधोकेबाजीPuneपुणे