शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बारामतीतील बोगस कोतवाल भरतीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 02:48 IST

बारामती येथील तहसील कार्यालयातील कोतवाल भरतीतील बनावट कागदपत्रांच्याआधारे एका महिलेची भरती केल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

बारामती - येथील तहसील कार्यालयातील कोतवाल भरतीतील बनावट कागदपत्रांच्याआधारे एका महिलेची भरती केल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. मेडद या गावातील काजल शिवाजी हिवरकर यांना डावलून अक्षदा शैलेश नेवसे यांची नेमणूक देण्यात आली. त्यामुळे काजल हिवरकर यांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. एवढेच नव्हे तर बनावट कागदपत्रांचे पुरावेच सादर केले. कोतवाल भरतीचा हा प्रकार उघड झाल्यामुळे महसूल प्रशासनाची तारांबळ उडाली.याबाबत तहसीलदार हनुमंत पाटील यांना भाजपचे अविनाश मोटे यांनी विचारणा केली. यावरून त्यांच्यात चांगलीच खंडाजंगी झाली. अखेर तहसीलदार पाटील यांनी दोन दिवसात याबाबत चौकशी करून निर्णय दिला जाईल, असे सांगितले. कागदोपत्री पूर्तता केली असताना हिवरकर यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे न्यायाची प्रतिक्षा कशी करायची, असा प्रश्न मोटे यांनी तहसीलदारांना विचारला.याबाबतची हकीकत अशी की, मेडद तालुका बारामती येथील कोतवाल पदाकरीता ९/२/२०१८ रोजी इतर मागासवर्गीय प्रवर्गातील भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. या अर्जामध्ये स्थानिक रहिवाशांना प्राधान्य देण्यात येणार असे स्पष्ट करण्यात आले होते. यावरून काजल हिवरकर यांनी आपला अर्ज दाखल केला. त्याचप्रमाणे अक्षदा नेवसे यांनीही अर्ज दाखल केला. अक्षदा नेवसे यांनी तहसीलदारांनी दाखल केलेल्या अर्जात मेडद येथील रहिवासी दाखविले.मात्र प्रत्यक्षात नेवसे यांची आधारकार्डची प्रत, युनिट रजिस्टर प्रत नावासहित, ग्रामपंचायतीचा कर भरत असलेली पोच पावती, ग्रामपंचायतीकडील कर आकारणीचा नोंदवहीचा उतारा, आदी कागदपत्रे उपलब्ध नाहीत. अशी स्पष्ट माहिती तहसील कार्यालयाने हिवरकर यांना दिली. याचवेळी १०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर तहसील कार्यालयातील रेकॉडमधील कर्मचारी शैलेश विजय नेवसे यांनी १५ वर्ष आईवडिलांसह भाडेकरू म्हणून रहात असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. मात्र प्रत्यक्षात नेवसे कुटूंबिय हे कसबा येथे रहात असल्याचे निष्पन्न होत आहे. एवढेच नव्हे तर मेडदच्या तलाठ्यांनी ९ मार्च २०१५ चा रहिवासी दाखला हा चुकीच्या पध्दतीने दिला आहे.नेवसे यांच्या रेशनकार्डमध्ये खाडाखोड करण्यात आली असून कसबा बारामती याला कंस करून मेडद ३५ पायऱ्यांजवळ रहात असल्याचे दाखवून उत्पन्न तर अवघे २५ हजार रुपये दाखविण्यात आले आहे. एका सरकारी कर्मचाºयाचे उत्पन्न अवघे २५ हजार दाखवून अक्षरश: कहर केला आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणात गट क्र. १० चा नेवसे यांनी सातबारा जोडलेला आहे. याच्यात कोठेही शैलेश नेवसे यांचा उल्लेख नाही यावरून तहसील कार्यालयातील विविध यंत्रणांचा वापर करून हे प्रकरण बनावट असल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे अक्षदा नेवसे यांचे मतदार यादीतील नाव बारामती कसबा येथे आहे. ग्रामस्थांना याबाबत विचारले असता शैलेश व अक्षदा नेवसे हे बारामतीमध्ये रहात असून मेडदमध्ये रहात नाहीत, असे सांगण्यात आले. यावरून या बनावट प्रकरणाचा पडदा फार्श झाला आहे.या प्रकरणात काजल हिवरकर यांच्यावर प्रचंड दबाव आणून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. मुळ प्रश्नांना बगल देवून न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला जातो याचे कारण हिवरकर हे गरीब कुटूंब असून त्यांच्यावर तहसील प्रशासनाने अन्याय केल्याचे दिसून येत आहे.याबाबत अविनाश मोटे यांनी तहसीलदारांना चर्चा करावयाची आहे, असे म्हटल्यानंतर तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर पडून चालत चालत बोलू या असे सांगून गाडीपर्यंत आले परंतू मोटे यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देवू शकले नाहीत.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या