शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

रिक्षाच्या भाड्यावरून तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 01:07 IST

रिक्षाचे भाडे न दिल्याने झालेला वाद होऊन त्यात मारहाण करून एकाचा खून करण्यात आला़

पुणे : रिक्षाचे भाडे न दिल्याने झालेला वाद होऊन त्यात मारहाण करून एकाचा खून करण्यात आला़ रविवार पेठेत झालेल्या या प्रकारात रिक्षाचालकाने जखमी झालेल्याला स्वत:च्या रिक्षातून ससून रुग्णालयात नेले़ पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने कोणी मारहाण केली हे माहिती नसल्याचे सांगितले़ पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हींची तपासणी केल्यावर त्यात रिक्षाचालक व त्याच्या साथीदारानेच मारहाण केल्याचे निष्पन्न झाले़फरासखाना पोलिसांनी रिक्षाचालक अतुल ऊर्फ ईश्वर दशरथ हराळे आणि त्याचा साथीदार रोहन ज्ञानेश्वर गोडसे (दोघे रा़ रविवारी पेठ) यांना अटक केली आहे़तानाजी धोंडीराम कोरके (वय ३०, रा़ मूळ रा़ निलंगा, जि़ लातूर) असे खून झालेल्याचे नाव आहे़ ही घटना रविवारी पेठेतील महाराणा प्रताप रोडवर शनिवारी दुपारी पावणेतीन वाजता घडली होती़याबाबत पोलिसांनी सांगितले की, अतुल हराळे यांच्या रिक्षात कोरके हे रविवार पेठेतील कासट दुकानाजवळ बसले़ काही अंतरावरील मोती चौकात ते रिक्षातून उतरले़ त्यांनी रिक्षाचे भाडे न दिल्याने त्यांच्यात वाद झाला़ कोरके तसेच निघून गेले़ काही अंतरावर ते हराळे यांना पुन्हा दिसले़ तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे भाड्याचे पैसे मागितले़ तेव्हा हराळे व त्याचा मित्र रोहन गोडसे यांनी कोरके यांना हाताने मारहाण केली़ त्यात ते रस्त्यावर पडल्याने डोक्याला जखम झाली़ त्याची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले़ तेव्हा हे दोघे तेथेच होते़ हराळे यांच्या रिक्षातूनच कोरकेयांना ससून रुग्णालयात नेले़ परंतु, कोरके यांना कोणी मारले हे माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले़त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केल्यावर त्यात रिक्षाचालक हराळे व त्यांचा मित्र रोहन गोडसे हेच मारहाण करत असल्याचे दिसून आले़ त्यावरून पोलिसांनी दोघांना अटक केली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण अंबुरे अधिक तपास करीत आहेत़