शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

शहरात रुग्णांना रक्त देता का कोणी रक्त?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 05:55 IST

शहरातील खासगी रक्तपेढ्यांमध्ये सर्वच गटाच्या रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, ससून रुग्णालयातदेखील रक्ताची टंचाई आहे. दैनंदिन गरज भागविण्यापुरताही रक्तसाठा नसल्याने गरजू रुग्णांच्या नातेवाइकांना रक्तासाठी धावपळ करावी लागत आहे.

पुणे : शहरातील खासगी रक्तपेढ्यांमध्ये सर्वच गटाच्या रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, ससून रुग्णालयातदेखील रक्ताची टंचाई आहे. दैनंदिन गरज भागविण्यापुरताही रक्तसाठा नसल्याने गरजू रुग्णांच्या नातेवाइकांना रक्तासाठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे कोणी रक्त देता का रक्त, असे म्हणण्याची पाळी रुग्णांच्या नातेवाइकांवर आली आहे.ससून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर लगतच्या जिल्ह्यातूनही रुग्ण येतात. साहजिकच येथे बाराही महिने रक्ताची मोठी गरज भासते. अपघातातील जखमी, सिझेरियन प्रसूती, इतर शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना रक्ताची गरज भासते. यासाठी रुग्णालयात रक्तपेढी असून, या ठिकाणी गरजूंना मोफत रक्त उपलब्ध करून दिले जाते. उन्हाळ्यात दरवर्षी रक्ताचा तुटवडा होतो. यावषीर्ही रक्तपेढीत सर्वच गटाच्या रक्ताचा तुटवडा आहे. रक्तपेढीत रक्त मिळत नसल्याने नाइलाजाने अनेक रुग्णांना खासगी रक्तपेढ्यांमधून रक्त विकत घ्यावे लागते. खासगी रक्तपेढ्यांमध्येही रक्तसाठा नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होत आहे. या महिन्यात रक्तदान शिबिरेही कमी होतात. त्यामुळे साठा होत नाही. दरवर्षी जून-जुलै महिन्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असतो.राज्यातील रक्तपेढ्यांतही कमतरतासध्या राज्यात अनेक ठिकाणी रक्ताची टंचाई आहे. मुंबई, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, अकोला या भागातून फोन येत आहेत. त्या ठिकाणी रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. पुण्यात त्या प्रमाणात रक्तदाते अधिक असल्याने या ठिकाणी रक्तासाठी चौकशी केली जाते. परंतु, सध्या पुण्यातही रक्ताचा साठा कमी झाला आहे. त्यामुळे अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्तच नाही. मागणी जास्त आणि पुरवठा कमी, अशी परिस्थिती निर्माण झाली असून, रक्तासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना भटकावे लागते.रक्तदात्यांना आवाहनदरवर्षी उन्हाळ्यात रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. रक्तपेढीत येऊन रक्तदान करणाऱ्यांची संख्या बºयापैकी असली, तरी उन्हाळ्यात हे प्रमाण कमी होते. तरुणांनी आपल्या मित्रांसह रक्तदान केले, तर टंचाई कमी होण्यास मदत मिळू शकते. रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी रक्तदात्यांनी समोर यावे, असे आवाहन ‘रक्ताचे नाते ट्रस्ट’चे संस्थापक अध्यक्ष राम बांगड यांनी केले आहे.रक्तदान कायदा हवा : रक्तदानाबाबतचा कायदा अस्तित्वात नाही. त्यामुळे रक्तदान क्षेत्रात रॅकेट तयार झाले आहे. ते केवळ पैशांसाठी काम करते. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. खरंतर ‘एफडीए’कडून नियंत्रण ठेवले पाहिजे. एखाद्या रक्तपेढीच्या परवान्याचे नूतनीकरण करताना त्यांनी योग्य रक्तसाठा ठेवण्याचे बंधन केले पाहिजे, तरच रक्ताची टंचाई जाणवणार नाही, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.सध्या समाजकारणाची भावना कमी झाली आहे. त्यामुळे रक्तदान कमी होत आहे. नागरिकांनी जवळच्या रक्तपेढीत जाऊन रक्तदान करणे आवश्यक आहे. रक्तपेढ्यांनीदेखील शिबिर आयोजित करून साठा वाढविला पाहिजे. रक्त मागण्यासाठी आलेल्या ग्राहकाला ‘नाही’ असे बोलण्यापेक्षा त्यांना रक्त मिळवून देण्यासाठी रक्तपेढ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. संयोजकांनी जून-जुलै महिन्यात अधिक शिबिरे आयोजित केली पाहिजेत. त्यामुळे या काळात रक्तसाठ्याची टंचाई कमी आहे. - राम बांगड, संस्थापक अध्यक्ष, रक्ताचे नाते ट्रस्टरक्तपेढी उपलब्धताजहॉँगीर हॉस्पिटलनोबेल हॉस्पिटलसाधू वासवानी मिशनछत्रपती शाहूमहाराज आधारदीनानाथ मंगेशकर ब्लड बॅँकग्रॅँट मेडिकल फाउंडेशनजनकल्याण रक्तपेढीनंदकिशोर एज्युकेशन सोसायटीकाशीबाई नवले हॉस्पिटल १ बॅगइंडियन रेडक्रॉस सोसायटी ७ बॅगराकेश जैन मेमोरियल २ बॅग(३ जून २०१८रोजीचे अपडेट)

टॅग्स :Puneपुणे