मोरगाव : बारामती तालुक्यातील २२ गावांसाठी शेती सिंचनासाठी पाणी मिळावे म्हणून आमरण उपोषण करणारे अंध चंद्रकांत कदम यांना पुणे जिल्हा बँकेतून पुन्हा एकदा सेवामुक्त केले आहे. यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कदम यांनी दि. १७ पासून अमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे.तालुक्यातील २२ गावांना पुरंदर उपसा सिंचनचे पाणी मिळावे, यासाठी जन्मत: दोेन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या कदम यांनी मुर्टी येथे अमरण उपोषण केले होते. यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरूद्ध निवडणुकीत दंड धोपाटले होते. यानंतर कदम यांना कामावर वेळेवर न येणे आदी कारणे दाखवुन पुणे जिल्हा बँकेच्या लिफ्टमॅन पदावरून कमी करण्यात आले होते. मात्र प्रसिद्धी माध्यमांनी याबाबत त्यांची बाजू माडल्यानंतर कदम याला कामावर पुन्हा घेण्यात आले. मात्र, दि. १ आॅगस्टपासून त्यांना जिल्हा बँकेच्या कमानीतूनच आत येण्यास मज्जाव त्यांना केला. सुरक्षारक्षकांनी त्यांना धक्काबुक्की करीत कामावरून कमी केले आह असे सांगितले. कामावर घेण्याचा निर्णय न झाल्यास कदम यांनी अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्याशी संपर्क साधला असता ठेकेदार बदलले असल्याने त्यांना कमी केले आहे. त्याचा बँकेशी काहीही संबंध नाही, असे सांगितले. (वार्ताहर)
अंध उपोषणकर्तेे चंद्रकांत कदम पुन्हा सेवामुक्त
By admin | Updated: August 8, 2015 00:44 IST