शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेला भिकारी बनविण्याचे भाजपाचे धोरण, विरोधकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:57 IST

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) उभारण्यात येत आहे. हा मार्ग महापालिकेच्या हद्दीतून जातो.

पुणे - हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) उभारण्यात येत आहे. हा मार्ग महापालिकेच्या हद्दीतून जातो. परंतु प्रकल्पाचा निधी उभारण्यासाठी या मार्गाच्या दोन्ही बाजूला बांधकाम विकास परवानगीचे अधिकार ‘पीएमआरडीए’ला मिळावेत अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. बांधकाम परवानगीचे अधिकारी पीएमआरडीएला देऊन पुणे महापालिकेला भिकारी बनविण्याचे धोरण राज्यातील सत्ताधारी भाजपाने आखले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केला.तुपे यांनी सांगितले की, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो हा मार्ग पालिका हद्दीतून जातो. या प्रकल्पाचा निधी उभारण्यासाठी या मार्गाच्या दोन्ही बाजूला बांधकाम विकास परवानगीचे अधिकार ‘पीएमआरडीए’ला मिळावेत, अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. यावर राज्य सरकारने महापालिकेकडून प्रस्तावही मागविला आहे. या मेट्रोसाठी ८ हजार ३०० कोटी रुपयांचा खर्च येणार असून हा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर उभारला जाणार आहे. त्यासाठी ‘पीएमआरडीए’ने सरकारकडे महापालिका हद्दीत विशेष नियोजन प्राधिकरणचा (एसपीए) दर्जा मागितला आहे. तसेच मेट्रो मार्गापासून दोन्ही बाजूस ५०० मीटरपर्यंतच्या हद्दीत होणाऱ्या बांधकामाचे अधिकार पीएमआरडीला द्यावेत, अशी मागणी केली आहे. हे अधिकार देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यास महापालिकेच्या उत्पन्नाला मोठा फटका बसणार आहे.तुपे यांनी सांगितले की, महापालिकेच्या हद्दीत विविध मार्गांनी घुसखोरी करण्याचे नियोजन पीएमआरडीएने केले आहे. महापालिका हद्दीस समाविष्ट झालेल्या गावांचा ‘विकास आराखडा’ (डीपी) तयार करण्याची मागणीही त्यांच्याकडून केली जात आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी पालिकेच्या अधिकारांवर अतिक्रमण करण्याचा डाव यानिमित्त आखला जात आहे. ज्या भागातून मेट्रो मार्ग जात आहे, तेथील बांधकामाचे अधिकार देण्याची मागणी पीएमआरडीए करते. मात्र तेथील पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, कचरा व्यवस्थापन याबाबतची जबाबदारी घेत नाही.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाPoliticsराजकारण