तालुकाध्यक्ष संतोष तांबे, जुन्नर शहर अध्यक्ष गणेश बुट्टे यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर येथील महावितरण कार्यालयासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी धरणे धरली.
ऊर्जा मंत्र्यांनी सुद्धा वीजबिल माफ करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, वीजबिले माफ झाले नाही. हे सरकार फसवे, खोटे आश्वासन देणारे दिशाभूल करणारे सरकार आहे, अशी टीका गणेश बुट्टे यांनी केली.
आंदोलना दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी महावितरणचे अभियंता यांना निवेदन देण्यात आले. अनु. जमाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष मधुकर काठे, उल्हास नवले, युसुफ शेख, निलेश, रोहिदास भोंडवे, अमोल शिंदे, अंबर परदेशी, मयुर तुळे, शंकर कुमकर, हरीष भावाळकर, रोहीदास कोल्हाळ, भगवानशेठ घोलप, दत्ताजी खोमने, जयदास साळवे, आदिनाथ शेलार, कुलदीप वाव्हळ, विशाल शिरसाठ, दत्तात्रय डुंबरे, बाबामिया शेख, अतुल वायकर, काशिनाथ आवटे, मन्सुर शेख, राजेश कुदळ, सुर्येकांत ढोले, सुमय्या शेख, स्मिता पन्हाळे, संजीवनी हांडे, वैशाली हांडे, माधुरी शिरसाठ, सुनिल गाडगे, सचिन शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, अरुण केदार, पंकज अल्हाट, हरीभाऊ शिंदे, किशोर पाटील, राजन वर्हाडी, रमेश वायकर, अविनाश शिंदे, साहेबराव तांबोळी, सुधिर खरात, सचिन डुंबरे, अर्जुन भांगरे, उमाजी गवारी, पांडुरंग जोशी, सोमनाथ भांगरे, बबन गंधट, मोहन नलावडे, सूर्यकांत सोनवने, नवशिराम किरवे, रोहण भोसले, सुरेश शिंदे, रामदास शिंदे, तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळ : जुन्नर येथील महावितरण कार्यालयासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी धरणे धरली.