कात्रज : देशात आणि राज्यात परिवर्तन घडवून मतदारांनी इतिहास रचला आहे़ पुणे महापालिकेतही परिवर्तन होणारच, असा ठाम विश्वास भाजपाचे पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी व्यक्त केला़ आंबेगाव-दत्तनगर-कात्रज गावठाण या प्रभाग ४0 मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार अभिजित कदम, संदीप बेलदरे पाटील, सुनीता सोपान लिपाणे-राजवाडे, स्वप्नाली महेश जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित महारॅलीच्या शुभारंभप्रसंगी गोगावले बोलत होते़ या वेळी आमदार भीमराव तापकीर, भाजपानेत्या संगीता राजेनिंबाळकर, पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर तात्यासाहेब कदम, खडकवासला मतदारसंघाचे भाजपाचे अध्यक्ष अरुण राजवाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती़ कात्रज जुना जकात नाका, संतोषनगर, दत्तनगर, जांभुळवाडी रस्ता, भारती विद्यापीठ, आंबेगाव पठारमार्गे इच्छापूर्ती गणेशमंदिराजवळ या महारॅलीचा समारोप झाला़ पदयात्रेत संजय कपिले, हरिभाऊ कामठे, अमर चिंधे, ज्योती पवार, महेश कदम, हरीशभाई शहा, मारुती लिपाणे, सुदाम लिपाणे, श्रीकांत लिपाणे, एकनाथ बेलदरे, रामचंद्र मोरे, मंगेश जाधव, सचिन पवार, नितीन जांभळे, अतिश जाधव, सागर कदम, अमित पांडे, शहाबाज खान, अभिजित कोंडे, साजीद भाई, वैजनाथ बिराजदार , राजू कदम कार्यकर्ते उपस्थित होते़ पदयात्रेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, महिला व मतदार बंधूंसोबत राहिले. कुणीही पदयात्रा सोडून गेले नसल्याबद्दल नगरसेवक अभिजित कदम यांनी आभार मानले़
महापालिकेत भाजपाचीच सत्ता येणार
By admin | Updated: February 13, 2017 02:12 IST