शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
2
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
3
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
4
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
5
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
6
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
7
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
8
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
9
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
10
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
11
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
12
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
13
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
14
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
15
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
16
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार
17
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात
18
मुलीने बॉयफ्रेंडशी लग्नाचा तगादा लावला, बापाने लेकीचा आवाज बंद केला; मृतदेह लटकवून वेगळाच बनाव रचला 
19
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे
20
पंक्चरचं दुकान अन् व्यवसायानं ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?

पोटनिवडणुकीमध्ये मनसेसह भाजपाने गमावली संधी

By admin | Updated: January 20, 2015 00:45 IST

महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक आणि भाजपपुढे दोन्ही जागेवर विजयी होण्याचे आव्हान होते.

पुणे : शहरातील दोन प्रभागांची पोटनिवडणूक विरोधी पक्षनेते पदासाठी निर्णायक ठरली. महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक आणि भाजपपुढे दोन्ही जागेवर विजयी होण्याचे आव्हान होते. मात्र, दोन्ही जागांवर सत्ताधारी राष्ट्रवादीने बाजी मारल्यामुळे मनसे व भाजपने संधी गमावली. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे कायम राहणार आहे. विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी प्रभाग क्रमांक २६ चे काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांनी पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीतून कसबा मतदारसंघातून निवडणूक लढविली. तर, प्रभाग क्रमांक ४६ चे शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी पदाचा राजीनामा देऊन मनसेतून हडपसर विधानसभा निवडणूक लढविली होती. दोघांना त्यात अपयश आले होते़ रिक्त झालेल्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. पूर्वी काँग्रेसमधून निवडणूक लढविलेल्या मानकर यांनी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीतून अर्ज भरला होता, तर प्रमोद भानगिरे यांनी स्वत: उमेदवारी अर्ज न भरता, स्थानिक आघाडीच्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाविषयी उत्सुकता होती. शहरात लोकसभा, विधानसभा व पुणे कॅन्टोन्मेंटच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे पोटनिवडणुकीतील दोन्ही जागा मिळवून विरोधी पक्षनेतेपद खेचून आणण्याचा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केला जात होता. त्यासाठी पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाजपचे कॅबिनेट व राज्यमंत्री उतरले होते. प्रभाग क्रमांक २६ मध्ये राष्ट्रवादीचे मानकर यांच्याविरोधात भाजपने माजी नगरसेवक दिलीप उंबरकर यांना उमेदवारी दिली होती. तर, प्रभाग क्रमांक ४६ मधील पोटनिवडणूक भाजपचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर, शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, काँग्रेसचे माजी आमदार बाळासाहेब शिरवकर व विधानसभेचे उमेदवार प्रमोद भानगिरे यांनी चुरशीची केली होती. (प्रतिनिधी)निर्णायक निकाल...महापालिकेत विरोधी पक्षनेते पद असलेल्या काँग्रेसचे संख्याबळ २९ होते, तर मनसेचे २८ आणि भाजपचे २६ असे संख्याबळ होते. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी मानकर यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसचे संख्याबळ एकने कमी होऊन २८ आणि भानगिरे यांनी राजीनामा दिल्यामुळे शिवसेनेचे १५ वरून १४ इतके संख्याबळ झाले होते. विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडून खेचून आणण्यासाठी मनसेला एका जागेची आणि भाजपला दोन जागांची आवश्यकता होती. मात्र, दोन्ही जागांवर राष्ट्रवादीने बाजी मारल्यामुळे मनसे व भाजपची संधी हुकली असून, विरोधी पक्षनेतेपद पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसकडे राहणार असल्याचे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले.