शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

‘बिटकॉईन’मधून करोडोंची फसवणूक, आठ जण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 04:06 IST

बिटकॉईन खरेदीतून आकर्षक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या ८ जणांना सायबर क्राईम सेलने अटक केली आहे़ यातील प्रमुख सूत्रधारासह आणखी ८ जण फरार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.

पुणे - बिटकॉईन खरेदीतून आकर्षक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या ८ जणांना सायबर क्राईम सेलने अटक केली आहे़ यातील प्रमुख सूत्रधारासह आणखी ८ जण फरार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.या प्रकरणात आतापर्यंत पुण्यातील एकूण २५ जणांची २ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी सायबर क्राईम सेलकडे आल्या आहेत़ पोलिसांनी आतापर्यंत अंदाजे ३२ बिटकॉईन, ७९़९९ इथर व ३८ लाख ९६ हजार रुपये रोख जप्त केले आहेत़ याशिवाय १६० बिटकॉईन, ३ लाख एमकॅप, ८० हजार इथर तपासात निष्पन्न झाले असून ते पोलिसांनी वॉलेटमध्ये हस्तांतरित केले आहे़आकाश कांतिलाल संचेती (वय २७, रा़ मुकुंदनगर), काजल जितेंद्र शिंगवी (वय २५, रा़ महर्षीनगर), व्यास नरहरी सापा (वय ४६, रा़ भवानी पेठ), हेमंत विश्वास सूर्यवंशी (वय ५१, रा़ बाणेर), हेमंत बाबासाहेब चव्हाण (४७, रा़ साडेसतरानळी, हडपसर), अजय तानाजी जाधव (वय २१, रा़ जनकपुरी, दिल्ली), पंकज श्रीनंदकिशोर आदलाखा (वय ४०, रा़ दिल्ली), हेमंत चंद्रकांत भोपे (वय ४६, रा़ डीएसके विश्व, धायरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़याप्रकरणी भीमसेन अग्रवाल (वय ६५) यांनी फिर्याद दिली आहे़ त्यानुसार एमपीआयडी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटक पाच आरोपींना ९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.बिटकॉईन गुंतवणुकीतून फसवणूक केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. त्यांनी दिल्लीतून पंकज आदलाखा यास अटक करीत त्याच्या इतर साथीदारांना अटक केली. त्यांनी मल्टीलेव्हल मार्केटिंगच्या माध्यमातून २ कोटी २५ लाखांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.सिंगापूर येथे गेन बिटक्वॉईन ही कंपनी आहे़ ही जीबी २१ या मुख्य कंपनीची उपकंपनी आहे़ बिटकॉईन कंपनीमध्ये १ बिटकॉईन गुंतवणुकीवर दरमहा ०.१ टक्के बिटक्वॉईन याप्रकारे १८ महिन्यांत १.८ बिटक्वॉईन परतावा देण्याचे आमिष दाखविले. हेमंत भोपे हा पुण्यातील इन्व्हेस्टमेंट सही या कंपनीमार्फत इन्व्हेस्टमेंट कशी आणि कोठे करावी, याचे सेमिनार घेत असे़ त्यातून निर्माण झालेल्या जनसंपर्काचा फायदा घेत त्याने अनेकांना गेन बिटकॉईनमध्ये चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणुकीस भाग पाडले आहे़ पंकज आदलाखा हा दिल्लीचा राहणारा असून, तो मोटीव्हेशनल स्पीकर म्हणून कार्यरत असताना त्याने अनेक एमएलएम कंपन्यांसाठी मार्केटिंग व ट्रेनिंग घेतल्याचे समोर आले आहे़ गेन बिटकॉईन कंपनीच्या योजनेच्या प्रचारासाठी त्याने पुणे, मुंबई, दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये तसेच दुबई येथे गेन बिटकॉईनतर्फे सेमिनार घेऊन लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले आहे़बिटकॉईनमध्ये परतावा न देता बाजारात काहीएक किंमत नसलेले आरोपींच्या कंपनीचे गेन बिटकॉईनन स्वत: तयार केलेले क्रिप्टो एमकॅप मार्फत परतावा दिल्याचे भासवून लोकांची करोडो रुपयांची फसवणूक केली आहे़ही कारवाई पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, आर्थिक व सायबर सेलचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ व त्यांच्या सहकाºयांनी केली आहे़काय आहे बिटकॉईन?बिटकॉईन ही (क्रिप्टोकरन्सी) आभासी चलन आहे, ते दृश्य नाही. मात्र, आॅनलाईन माध्यमातून ई-बॅलेन्स स्वरूपात दिसते. त्यावर कोणत्याही शासकीय यंत्रणेचे नियंत्रण नाही. एक बिटकॉईनचे मूल्य सुमारे ५ लाख इतके आहे. तर, एमकॅपचे मूल्य १३ रुपये आहे़ अशाप्रकारे गुंतवणूक करून फसवणूक केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात १९, तसेच निगडी पोलिसांत ८ अशा एकूण २७ तक्रारी आल्या आहेत. तक्रारींचा आकडा शंभरी पार करू शकतो. फसवणूक झालेल्यांनी सायबर सेल शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्तप्रदीप देशपांडे यांनी केले आहे़याप्रकरणातील प्रमुख सूत्रधार अमित भारद्वाज हा असून, तो व त्याचा भाऊ अजय भारद्वाज यांच्यासह त्यांचे साथीदार फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली आहे़ त्यांनाही लवकरच पोलीस पकडतील़- रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त

टॅग्स :Crimeगुन्हाBitcoinबिटकॉइन