शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बिमल रॉय यांची ‘मधुमती’ मराठीत; राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 15:02 IST

ग्रंथाली प्रकाशित बिमल रॉय यांची मधुमती या सरोज बावडेकर अनुवादित मराठी पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ दिग्दर्शिका चित्रा पालेकर यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे करण्यात आले.

ठळक मुद्देमधुमती हे इंग्लिश पुस्तक जास्तीत जास्त लोकांनी वाचावे यासाठी मराठी अनुवाद केला : बावडेकरवडिलांच्या स्मृतिदिनाची आठवण म्हणून लिखाण करत आहे : रिंकी रॉय भट्टाचार्य

पुणे : ‘सुहाना सफर और ये मौसम हसीं, हमे डर है कि हम खो ना जाये कहीं’ अशा मधुमती या चित्रपटातील दिलीप कुमार यांच्या या गाण्याने बिमल रॉय यांच्यावरील मधुमती पुस्तकातील आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते बिमल रॉय यांच्यावरील पुस्तकांचे प्रकाशन. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे बिमल रॉय फिल्म सोसायटी, पेंग्विन बुक, ग्रंथाली आणि आशय फिल्म क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने बिमल रॉय यांच्या उत्तुंग चित्रपट कारकिर्दीचा लेखाजोखा मांडणाऱ्या रिंकी रॉय भट्टाचार्य लिखित ‘द मॅन हू स्पोक इन पिचर्स’ या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या पुस्तकाचे ग्रंथाली प्रकाशित बिमल रॉय यांची मधुमती या सरोज बावडेकर अनुवादित मराठी पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ दिग्दर्शिका चित्रा पालेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयचे संचालक प्रकाश मगदूम, ग्रंथालीच्या उषा मेहता, धनश्री धारप, लेखिका रिंकी रॉय भट्टाचार्य व सरोज बावडेकर आदी उपास्थित होते. या कार्यक्रमात दोन्ही पुस्तकातील उताऱ्याचे अभिवाचन व दृकश्राव्य कार्यक्रमाचे सादरीकरण झाले.यावेळी ग्रंथालीच्या उषा मेहता यांनी लेखिका सरोज बावडेकर यांची मुलाखत घेतली त्यावेळी बावडेकर म्हणाल्या, की मी लहानपणापासून चित्रपट पाहत आले आहे. मी कुठलाही चित्रपट असो आवड निवडीचा विचार न करता बघायला जात असे. या कारणामुळे मला चित्रपटाची आवड निर्माण झाली. बिमल रॉय यांचे चित्रपट मला अजूनही आवडतात, त्यांच्या अनेक चित्रपटातून शोषितांचा आणि सामाजिक लढा दिसून येतो. मधुमती हे इंग्लिश पुस्तक जास्तीत जास्त लोकांनी वाचावे यासाठी मी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला.कार्यक्रमात मोहन आगाशे यांनी लेखिका रिंकी रॉय भट्टाचार्य यांची मुलाखत घेतली तेव्हा भट्टाचार्य म्हणाल्या, की माझे वडिल बिमल रॉय हे कामाशी नेहमी संलग्न होते. ते कुठल्याही प्रकारचे व्यसन करत नसत. त्यांनी दारूला कधीही हात लावला नाही. पण कुठलेही काम मनापासून करण्याचे व्यसन त्यांना होते. त्याचे व्यक्तिमत्व अतिशय उत्तम आणि स्वभाव हा शांत होता. मी नऊ वर्षांची असताना आम्ही आमच्या परिवारासह मुंबईला आलो. त्यानंतर वडिलांनी चित्रपटाविषयी कामाला सुरुवात केली. आम्ही मध्यमवर्गीय घरात राहणारे होतो. बरेच लेखक, संगीतकार, दिग्दर्शक आमच्या या लहानश्या घरात भेटायला येत असे. कोलकाता येथे राहत असताना त्यांना चित्रपट निर्मिती करण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण  त्याकाळात भारत पाकिस्तान फाळणी या कारणामुळे अयशस्वी ठरले. पण काही कालांतराने त्यांनी मुंबईला जाण्याचे ठरवले आणि या शहरात त्यांना कामाला चालना मिळाली. मी २२ वर्षांची असताना वडिलांचे निधन झाले. तेव्हापासून दरवर्षी म्हणजेच ८ जानेवारीला त्यांच्या स्मृतिदिनाची आठवण म्हणून लिखाण करत आहे. कार्यक्रमात जुन्या आठवणी जाग्या करण्यासाठी शशी कपूर आणि दिलीप कुमार यांच्या गाण्यांची चित्रफित दाखवण्यात आली.

टॅग्स :Mohan Agasheमोहन आगाशेPuneपुणे