शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

भामा-आसखेड प्रकल्पग्रस्त : पुनर्वसनाच्या कारवाईला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 01:03 IST

भामा-आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी खेड व दौड तालुक्याच्या लाभक्षेत्रात जमिनी शिल्लक नाही.

खेड : भामा-आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी खेड व दौड तालुक्याच्या लाभक्षेत्रात जमिनी शिल्लक नाही. अशा पार्श्वभूमीवर इतर लाभक्षेत्रातील जमिनी मिळवणे तसेच नुकसानभरपाई कशी असावी, यासाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. आधी पुनर्वसन मग धरण, असे आश्वासन देऊनही ३५ वर्षांनंतर का होईना पुनर्वसनाच्या कार्यवाहीला अखेर मुहूर्त मिळाला आहे.जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि खेडचे प्रांताधिकारी आयुषप्रसाद यांच्या वेगवान कारभारानेभामा आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाला गती आली. ४०३ पूर्णत: बाधित आणि पात्र लाभार्थ्यांच्या नावाने सातबारा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. त्यानुसार ३५ हेक्टर खेड व ६६ हेक्टर दौंड तालुक्यात धरणग्रस्तांना देण्यात आली. त्यातील काही सातबारा वाटप आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. धरणग्रस्तांच्या दृष्टीने ही पहिली सुखनैव बाब होती.याबाबत सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, की तीनशे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यांना लाभक्षेत्रात देण्यासाठी जमीन उपलब्ध नाही. तसेच काहींची मागणी जमिनीऐवजी नुकसानभरपाई मिळण्याची आहे. या दोन्ही मुद्यांच्या अनुषंगाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. इतर लाभक्षेत्रात पुनर्वसनासाठी जमीन मिळावी या मागणीसह नुकसानभरपाई कशी असावी, याची मार्गदर्शन या प्रस्तावाद्वारे मागवण्यात आले असल्याचे प्रसाद यांनी सांगितले.संकलन दुरुस्तीनंतर शासनाच्या लेखी किती धरणग्रस्तांचेपुनर्वसन करणे आवश्यक असल्याचे चित्र स्पष्ट झाले. अर्थात शासनाच्या लेखी अपात्र असणाऱ्या काही धरणग्रस्तांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.६८ जणांना सातबारा वाटप झाले असले तरी मोठे काम अजून बाकी आहे. त्यातच वाटपास जमीन शिल्लक नसणे व जमिनीऐवजी आर्थिक पॅकेजचा विषय पुढे येणे या दोन मुद्यांवर पुनर्वसन जमीन दुसºया लाभक्षेत्रात द्यावी व पॅकेज कसे असावे याबाबतचाप्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. सरकारी पातळीवरून त्वरित निर्णय घेतला गेल्यास एकदाची सुरू झालेली पुनर्वसन प्रक्रिया पुढेजाऊ शकते.इतर लाभक्षेत्रात जमीन पुनर्वसनासाठी मिळावी आणि नव्याने करण्यात आलेल्या आर्थिक पॅकेजबाबत मार्गदर्शक तत्त्वे असावीत, यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ६८ धरणग्रस्तांना सातबारा वाटप नुकतेच करण्यात आले. हा विषय त्वरित तडीस नेण्याचा प्रयत्न आहे.- आयुष प्रसाद,सहायक जिल्हाधिकारीवांगमराठवाडी आणि कावडी प्रकल्पग्रस्तांना आर्थिक मोबदला देऊन पुनर्वसन करण्यात आले आहे. पुनर्वसनाच्या जमिनीचा ताबा अथवा उत्तर अडचणी असतील तर भामा-आसखेड धरणग्रस्तांना विश्वासात घेऊन आर्थिक पॅकेजचा पर्याय खुला ठेवण्यात यावा. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भूखंड, व्यावसायिक संधीचा सरकारने पुनर्वसनासाठी विचार करावा.- रोहिदास गडदे,बाधित शेतकरी

टॅग्स :Puneपुणे