शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

पालिका मिळकतींचे कोट्यवधी थकले

By admin | Updated: March 26, 2015 00:06 IST

उत्पन्न घटल्याने चिंतेत असलेल्या पुणे महापालिकेच्या ६०० मिळकतींच्या भाड्याची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याचे उजेडात आले आहे.

दीपक जाधव ल्ल पुणेउत्पन्न घटल्याने चिंतेत असलेल्या पुणे महापालिकेच्या ६०० मिळकतींच्या भाड्याची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याचे उजेडात आले आहे. वाहनतळ, भूमी, भवन व सदनिका मिळून एकूण ६०० मिळकतींची ४ कोटी ७४ लाख ४३ हजार रुपयांची थकबाकी आहे. महापालिकेच्या मोक्याच्या ठिकाणच्या ६०० मिळकती नाममात्र भाड्याने ५४७ व्यक्ती व संस्थांना भाड्याने देण्यात आल्या आहेत. तरी नाममात्र भाडेही भरण्यास या भाडेकरूंकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वसामान्यांची मिळकतकराची काही हजारांची थकबाकी असली तरीही त्यांच्या घरी बँडबाजा घेऊन जाऊन त्याची वसुली करणाऱ्या महापालिका प्रशासनाने मिळकतींच्या थकबाकीदारांबाबतही कडक धोरण स्वीकारण्याची गरज आहे. भवन विभागाकडील मिळकतींचे सर्वाधिक थकबाकीदार आहेत. व्यावसायिक गाळे, सदनिका, व्यायामशाळा, जलतरण तलाव या १०० मिळकतींची २ कोटी ४२ लाख रुपयांची थकबाकी आहे. भूमीच्या ९१ मिळकतींची ४७ लाख, ३७५ सदनिकांची ८८ लाख रुपये थकबाकी आहे. शहरात पालिकेचे ३४ वाहनतळ आहेत. त्यांपैकी महात्मा फुले मंडई, गुलटेकडी, शिवाजीनगर जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर, मनपा भवन टपळे गॅरेज या ६ वाहनतळांच्या ठेकेदारांकडे ६ लाख ५ हजार रुपयांची थकबाकी आहे. मिळकतींच्या भाड्याबरोबरच सेवाकराचीही मोठी थकबाकी आहे. भूमी, भवन, सदनिका, वाहनतळ यांच्या थकबाकीदारांकडून एकूण ३५ लाख २० हजार ७३१ रुपयांचे पालिकेला येणे आहे. राज्य शासनाने एलबीटी बंद करण्याची घोषणा केल्यापासून पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. राज्यशासनाच्या अनुदानावर महापालिकांना अवलंबून राहावे लागणार आहे. ही थकबाकी वसूल करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे....तर मिळकती सील करणारमहापालिकेकडून भाड्याने मिळकती घेतलेल्या थकबाकीदारांनी ३१ मार्च २०१५ च्या आत थकबाकी भरावी; अन्यथा संबंधितांना नोटिसा पाठवून करारानुसार मिळकती सील करण्याची कारवाई केली जाईल. तरी तातडीने ही थकबाकी भरण्यात यावी.- सतीश कुलकर्णी, मालमत्ता व व्यवस्थापन विभागाचे प्रमुखशहरातील विभागनिहाय थकबाकीदारविभागमिळकतींची संख्याभाडे थकबाकीसेवाकर थकबाकीभूमी९१४७ लाख ४८ हजार८ लाख ४३ हजारभवन१००२ कोटी ४२ लाख२६ लाख ७७ हजारसदनिका३७५८८ लाख ८१ हजार -वाहनतळ३४६० लाख ५ हजार -एकूण६००४ कोटी ३९ लाख३५ लाख २० हजार