शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

बिल भरा, नाही तर वीज कट

By admin | Updated: March 4, 2016 00:23 IST

वीज बिल भरा, नाही तर वीजजोड तोडण्यात येईल, असे फर्मान महावितरणने सोडले आहे. महावितरणचे कर्मचारी स्पिकरवरून अनाउन्समेंट करीत शहरात फिरत आहेत.

पिंपरी : वीज बिल भरा, नाही तर वीजजोड तोडण्यात येईल, असे फर्मान महावितरणने सोडले आहे. महावितरणचे कर्मचारी स्पिकरवरून अनाउन्समेंट करीत शहरात फिरत आहेत. मार्च महिन्यात वार्षिक बिल वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी महावितरणने हा फंडा अवलंबला आहे. या प्रकारच्या दवंडीने नागरिकांनी धास्ती घेतली आहे. मार्च महिना म्हटले की, आर्थिक वर्षाचे टार्गेट पुणे करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी धावपळ करतात. बॅँका तसेच सरकारी आणि खासगी संस्था आणि कार्यालये आपले हिशोब आणि ताळेबंद पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. महावितरणही यात मागे नाही. वार्षिक टार्गेट पूर्ण करण्यासाठी महावितरणतर्फे विविध फंडे अवलंबिले जात आहेत. वीज बिल भरण्याचे आवाहन करणारी वाहने शहरात फिरत आहेत. मराठी आणि हिंदी भाषेत अनाउन्समेंट करीत बिल भरण्याचे आवाहन केले जात आहे. बिल भरा, नाही तर वीज खंडित केली जाईल, असे सांगितले जात आहे. अचानक या प्रकारे महावितरणकडून अनाउन्समेंट होत असल्याने नागरिक धास्तावले आहेत. यामुळे नागरिक दक्ष झाले असून, परीक्षेच्या या हंगामात वीजजोड खंडित होण्याची कारवाई होऊ नये म्हणून नागरिक काळजी घेत आहेत. (प्रतिनिधी)अ‍ॅप आणि आॅनलाइन पेमेंटला पसंतीमहावितरणच्या अ‍ॅप आणि आॅनलाइन बिलाचे पेमेंट करण्यास सुशिक्षित मंडळींचा कल आहे. त्यामुळे घरबसल्या काही सेकंदात बिल अदा केले जात आहे. पिंपरी विभाग सर्वाधिक ग्राहक आॅनलाइन पेमेंटला पसंती देत आहेत. भोसरी विभागात औद्योगिक ग्राहकांना आॅनलाइन बिल भरणे सक्तीचे असल्याने ते नियमितपणे त्या पद्धतीनेच भरतात. स्मार्ट फोनवर अ‍ॅप डाउनलोड करून बिल भरणारे असंख्य ग्राहक आहेत. नागरिकांना बिल भरण्यासाठी या माध्यमातून जागृत केले जात आहे. या महिन्यात सर्वाधिक सुट्या आहेत. यात बिल भरणे राहून गेल्यास कारवाई होऊ शकते. त्यामुळे वीजजोड खंडित करण्याची कारवाई महावितरणच्या कर्मचाऱ्यांना करावी लागते. यामुळे संबंधित ग्राहक आणि त्यांच्या कुटुंबीयांना विजेअभावी नाहक गैरसोयीला सामोरे जावे लागते. वेळेवर बिल भरून पुढील मनस्ताप टाळावा. - धर्मराज पेटकर,कार्यकारी अभियंता, भोसरी