शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी सण मोठा ! नाही आनंदा तोटा

By admin | Updated: October 21, 2014 05:20 IST

भारतीय संस्कृतीतील सर्वांत मोठ्या दिवाळी सणास सुरुवात होत असतानाच बाजारपेठा विविधतेने नटल्या आहेत.

पिंपरी : भारतीय संस्कृतीतील सर्वांत मोठ्या दिवाळी सणास सुरुवात होत असतानाच बाजारपेठा विविधतेने नटल्या आहेत. फराळ, कपडे, फटाके, फुले, चोपड्या, किराणा सामान, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, आकाशकंदील आदी दिवाळीचे महत्त्व व प्रसन्नता वाढवणाऱ्या सगळ्याच गोष्टी बाजारात दिसत आहेत. त्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांच्या गर्दीने पिंपरी कॅम्प परिसर व शहरातील इतर ठिकाणच्या बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. दिवाळीत कपड्यांना वेगळेच महत्त्व असते. लहान-थोर सर्वच नवे कोरे कपडे परिधान करून नटण्याचा प्रयत्न करतो. दिवाळीच्या आनंदामध्ये नव्या-कोऱ्या कपड्यांची भर पडते. दर वर्षी कपड्यांचे अनेक नवे ट्रेण्ड बाजारात येत असतात. आता रेडिमेड कपड्यांना जास्त मागणी असते. मुले आणि महिलांच्या वस्त्रप्रावरणात अनेक नवे ट्रेण्ड आले आहेत. दुकानामध्ये कपड्यांची आकर्षक पद्धतीने केलेली सजावट मनाला भुरळ घालणारी असते. या वर्षी कपड्यांच्या किमती १० टक्क्यांनी वाढल्या आहेत. तरीही गर्दी वाढतीच आहे. आकर्षित करणारे पोषाख दाखल झाले आहेत. या वर्षी मोदी कुर्ता, जॅकेट, फुल कुर्ता विशेष आकर्षण आहे. टीव्ही मालिकांमध्ये अभिनेत्रींनी घातलेल्या विविधरंगी आणि डिझायनर साड्यांना महिलांची पसंती आहे. नवीन फॅशननुसार शॉर्ट शर्टला सर्वाधिक मागणी असल्याचे त्यात नवनवीन प्रिंटेड, प्लेन, डिझायनिंग शर्ट, पंजाबी सूट आणि लहान मुलांसाठी रेडिमेड ड्रेस आले आहेत. साड्यांच्या किमती ३०० पासून १५ ते ३० हजारांपर्यंत आहेत. पंजाबी ड्रेस आणि अनारकली ड्रेसच्या किमती १ ते ७ हजारांपर्यंत आहे. पुरुषांच्या जीन्स आणि शर्ट-पॅण्टच्या किमती ४०० ते २० हजार रुपयांपर्यंत आहे. फटाक्यांमध्ये फॅन्सी फटाके आणि विविध प्रकारचे झाड खरेदीचा उत्साह बच्चे कंपनीत दिसून येत आहे. लहान स्टॉलधारकही मोठ्या प्रमाणात आहेत. (प्रतिनिधी)