शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Pune | द्राक्षाच्या भावात १० वर्षातील सर्वात मोठी घसरण, उत्पादक शेतकरी अडचणीत

By अजित घस्ते | Updated: April 22, 2023 17:59 IST

३० ते ४० टक्के राज्यातील द्राक्षे उत्पादक शेकऱ्यांचे यंदा नुकसान...

पुणे : राज्यात गारपीठ व अवकाळी पावसाचा द्राक्षाला मोठा फटका बसला आहे. नाशिक, नगर भागात अद्याप २५ ते ३० हजार टन माल जागेवरच आहे. शेतात उभे असलेले पीक जाण्याच्या मार्गांवर असताना अवकाळी पाऊस फटका बसल्याने अनेक द्राक्षे बागाचे मोठे नुकसान झाले. मालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजारात द्राक्षे पाठवत आहेत. मात्र बाजारात द्राक्षाला उठाव नसल्याने दरही मिळत नाही. परिणामी द्राक्षे बागायतदारांचा खर्चही निघत नसल्याने यंदा शेतकरी हतबल झाले असल्याने पुढील वर्षी द्राक्षेचे पीक घ्यायचे की नाही, हा प्रश्न द्राक्षे बागायतदारांना पडत आहे.

लॉकडॉऊन काळातही द्राक्षांना ३५ ते ४० रूपये किलोला भाव मिळत होता. मात्र सध्या घाऊक बाजारात १५ ते ३० रूपये पर्यत द्राक्षेला भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च ही निघत नसल्याने यंदा शेतकरी अडचणीत आहे. दरवर्षी १५ डिसेंबर पासून द्राक्षाचा हंगाम सुरू होतो. एप्रिलपर्यंत चालत असतो. यंदा मे अखेरपर्यंत हंगाम सुरू राहिल. फळेही उशीरा लागल्याने द्राक्षाचा हंगाम महिनाभराने पुढे सरकला आहे. पावसाळी वातावरण कायम राहिल्यास द्राक्षाच्या भावात आणखी घट होण्याची शक्यता असल्याचे मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

बाजारातील १५ किलो द्राक्षाचे भावद्राक्ष         भाव

सोनाका            ४०० ते ४५०सुपर सोनाका       ४०० ते ५००

तास गणेश         ३०० ते ३५०माणिक चमण       ३५० ते ४००

का झाले दर कमी

- अवकाळी पावसाचा द्राक्षाला मोठा फटका

- वारंवार पावसामुळे यंदा द्राक्षांच्या पिकाची गोडी कमी झाल्याने परदेशात मागणी घटली.

- परदेशात मागणी कमी झाल्याने बागेत द्राक्षे शिल्लक

- अद्यापही पावसाचे सावट कायम

- बाजारात मागणी कमी आणि आवक अधिक

- बाजारात सर्व मालाची विक्री त्या प्रमाणात होत नाही.

राज्यातील काही पट्टयात द्राक्षाला चांगला भाव मिळाला असला तर काही भागात बरेच शेतक-यांचे ३० ते ४० टक्के नुकसान झाले आहे. एकरी ५ लाख खर्च होतो. एक किलो  २० ते २२ रूपये खर्च करावा लागतो. मात्र यंदा मालाची विक्रीच घाऊकमध्ये १५ ते २० रूपये होत असल्याने शेतक-यांना खर्चही निघत नाही. ज्या शेतक-यांचे ४० टन पेक्षा माल गेला आहे. त्याना किमान उत्पादन खर्च निघाला आहे. मात्र त्यांचे १० टनाच्या आत उत्पादन निघाले आहे. अशा बागायदारांना उत्पादन खर्च हि निघाला नाही. त्यामुळे शेतकरी यंदा संकटात सापडला आहे.

- शिवाजी पवार , अध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्षे बागायतदार संघ

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड