शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पायवाटांवर वर्दळ मोठी; पण टेकड्यांवरचा एकांत धोक्याचाच..!

By admin | Updated: February 27, 2016 04:39 IST

वेताळ टेकडीचा विस्तीर्ण परिसर, दाट झुडपे, बंद पडलेली खाण, एकांतात बसलेली जोडपी, एकट्या फिरणाऱ्या तरुणी... सूर्य मावळतीला चाललेला... अंधार पडत चालल्याने लोकांची

पुणे : वेताळ टेकडीचा विस्तीर्ण परिसर, दाट झुडपे, बंद पडलेली खाण, एकांतात बसलेली जोडपी, एकट्या फिरणाऱ्या तरुणी... सूर्य मावळतीला चाललेला... अंधार पडत चालल्याने लोकांची वर्दळही कमी होते... पण याची फिकीर कुणाला? अशा स्थितीतही एकट्या तरुणी, जोडपी स्वत:च्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून आपल्याच नादात असल्याचे दृश्य वेताळ टेकडीवर पाहायला मिळाले.व्यायाम किंवा फिरायला टेकड्यांवर जाणाऱ्या पुणेकरांच्या यादीत वेताळ टेकडी हेही आवडीचे ठिकाण. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण या टेकडीवर फिरण्याचा, व्यायामाचा आनंद घेतात. शुक्रवारीही या टेकडीवर गेल्यानंतर हेच दृश्य पाहायला मिळाले. प्रत्येक जण टेकडीवरील पायवाटांवरून फिरत होता. ज्येष्ठ नागरिक व तरुणाचे प्रमाण जास्त दिसते. काही जोडपी आणि एकट्या महिला व तरुणीही दिसून आल्या. वेताळ टेकडीवर सायंकाळी फिरण्यासाठी येणाऱ्यांची मोठी वर्दळ असली, तरी या टेकडीवर असलेली दाट झुडपे आणि बंद पडलेल्या खाणीमुळे एकांत धोक्याचा ठरू शकतो. टेकडीचा विस्तीर्ण परिसर मोठा असून झाडाझुडपांचे प्रमाणही जास्त आहे. अंधार पडल्यानंतर काही जोडपी व एकट्या मुली बिनधास्तपणे टेकडीवरील निर्जन ठिकाणी फिरताना आढळून आली.टेकडीचा परिसर मोठा असून अनेक पायवाटा आहेत. या रस्त्यानेही महिला-तरुणी एकट्या बिनधास्तपणे फिरताना दिसल्या. टेकडीवर असलेल्या बंद खाणीलगत तरुण-तरुणींचे घोळके, जोडपी दिसून आली. अंधार वाढत गेल्यानंतरही काही जोडपी खाणीच्या दिशेने जात होती. एकट्या मुलीही मोबाइलवर गाणी ऐकत फिरत होत्या. परिसरातील दाट झुडपांमुळे हा एकांत धोक्याचा ठरू शकतो, याचे भानही त्यांना नव्हते. पायवाटांच्या बाजूला ठिकठिकाणी सिमेंटच्या टाक्या ठेवण्यात आल्या आहेत. टेकडीवर येताना आणलेला कचरा लोक या टाक्यांमध्ये टाकतात. यांतील काही टाक्यांमध्ये मद्याच्या बाटल्या, प्लॅस्टिकचे ग्लास, पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या प्लेट आढळून आल्या. त्यामुळे या टेकड्यांवर मद्यपींचा वावर किंवा ओल्या पार्ट्याही रंगत असतील, अशी शक्यता आहे. वन विभाग व पुणे महापालिकेमार्फत नागरी वनव्यवस्थापन समितीमार्फत टेकडीवर व्यवस्थापन केले जाते. पण, सिमेंटच्या टाक्यांमधील मद्याच्या बाटल्या पाहून या बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. टेकडीचा विस्तीर्ण परिसर पाहता, सुरक्षा पुरविणे शक्य नसल्याने प्रत्येकाने आपल्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे.(टीम लोकमत : राहुल कलाल, हिना कौसर खान-पिंजार, राजानंद मोरे, लक्ष्मण मोरे, सायली जोशी-पटवर्धन, अनिरुद्ध करमरकर, दत्तप्रसाद शिंदे.)