शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
4
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
5
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
6
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
7
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
8
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
9
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
10
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
11
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
13
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
14
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
15
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
16
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
17
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
18
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
19
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
20
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  

कारेगाव-रांजणगाव गणपती गटात मोठी चुरस

By admin | Updated: January 31, 2017 03:56 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने भोसरी, चाकणनंतरचा पंचतारांकित औद्योगिक पट्टा म्हणजे शिरूर तालुक्यातील

रांजणगाव गणपती : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने भोसरी, चाकणनंतरचा पंचतारांकित औद्योगिक पट्टा म्हणजे शिरूर तालुक्यातील कारेगाव-रांजणगाव गणपती जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग आला असून, मोठी चुरस निर्माण झाली आहे. औद्योगिक पट्ट्यात वर्चस्व निर्माण करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी या गटाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मुळातच हा गट सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्याने दिग्गज मंडळींचे मनसुबे संपुष्टात आले आहेत. आपापल्या सोयीने महिलांना उमेदवारी जाहीर करण्याची वेळ आली. या गटात गेल्या निवडणुकीत आमदार बाबूराव पाचर्णे यांचे पुत्र राहुल पाचर्णे यांनी कडवी लढत देऊन विजय संपादन केला होता. आता गतवेळच्या गटरचनेत बदल होऊन गावांची अदलाबदल झाली आहे. सुमारे ३० हजारांच्यादरम्यान मतदार आहे. आरक्षणही सर्वसाधारण महिलांसाठी झाल्याने राहुल पाचर्णे यांनी न्हावरा गटातून उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु आता शिरूर पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण आल्याने राजकीय समीकरणात मोठा फेरबदल होईल, यात शंका नाही. त्यामुळे पंचायत समिती गणांच्या इच्छुकांमध्ये वाढ होणार आहे. कारेगाव-रांजणगाव गणपती गटासाठी राष्ट्रवादी क ाँग्रेस तसेच भाजपा या पक्षांच्या इच्छुक महिला उमेदवारांनी प्रचाराची धुरा गेल्या २ ते ३ महिन्यांपासूनच आपल्या खांद्यावर घेऊन उमेदवारी दाखल करण्याआधीच मतदारसंघात गावभेट दौरे करीत प्रचारात रंगत आणली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये रांजणगावच्या विद्यमान सरपंच स्वाती पाचुंदकर, जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब शिंदे यांच्या पत्नी सखुबाई शिंदे, पंचायत समितीच्या सदस्या दीपाली शेळके, कारेगावच्या पुष्पलता नवले यांचा समावेश आहे, तर पंचायत समितीच्या सदस्या मनीषा पांचगे या भाजपाकडून दावेदार समजल्या जातात. कोंढापुरीच्या ज्योती गायकवाड यांचेही भाजपातर्फे या गटात उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसकडून पुष्पलता ओस्तवालांच्या नावाची चर्चा आहे. स्वाती पाचुंदकर व मनीषा पाचंगे यांनी गावभेट दौरे करून घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. औद्योगिक पट्ट्यातील हा जिल्हा परिषद गट असल्याने सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेचा केल्याने निवडणुकीत प्रचाराची राळ उठविली जाणार, यात शंका नाही. या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. (वार्ताहर)कारेगाव गण सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित गटातील कारेगाव गणात सुमारे १५ हजार पाचशेच्यादरम्यान मतदार असून सर्वसाधारण जागेसाठी हा गण आरक्षित आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने कारेगावचे सरपंच अनिल नवले, माजी उपसरपंच विश्वास कोहकडे, कान्हूरमेसाईचे सुधीर पुंडे, बंडू पुंडे, ढोकसांगवीचे सरपंच मल्हारी मलगुंडे, सुहास मलगुंडे, सोनेसांगवीचे दत्तात्रय कदम, वाघाळ्याचे सरपंच पप्पू भोसले, दीपक तळोले, उत्तम व्यवहारे यांनी उमेदवारी मिळावी, म्हणून सूत्रे हलविली आहेत. भाजपाच्यावतीने उमेदवारी मिळविण्यासाठी गणेश ताठे, दादासाहेब खर्डे, रामदास धुमाळ, गणेश धुमाळ प्रयत्नशील आहेत.रांजणगाव गणात इच्छुकांची मांदियाळीरांजणगाव गणपती गणात सुमारे १४ हजार पाचशेच्यादरम्यान मतदार आहे. येथेही राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांची मांदियाळी असून कोंढापुरीचे उपसरपंच आशिष गायकवाड, खंडाळ्याचे सरपंच राजेंद्र नरवडे, गणेगावचे राजेंद्र धुमाळ, सुनील तांबे, बाळासाहेब टेमगिरे, रमेश धुमाळ, सुहास बांगर, रांजणगावचे श्रीकांत पाचुंदकर, गणेश लांडे, सर्जेराव खेडकर, बबनराव कुटे, पिंप्री दुमालाचे माजी सरपंच दिलीप खळदकर, बाभुळसरचे सरपंच दशरथ फंड आदींचा इच्छुकांमध्ये समावेश आहे. भाजपातर्फे रांजणगावचे ग्रा. पं. सदस्य विक्रम पाचुंदकर, कोंढापुरीचे माजी सरपंच अशोक गायकवाड, रणजित फंड उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलणार?खऱ्या अर्थाने हा गट दिलीप वळसे-पाटील प्रतिनिधित्व करीत असलेल्या आंबेगाव मतदारसंघात येत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, माजी जि. प. सदस्य शेखर पाचुंदकर यांनी कारेगाव रांजणगाव गणपती जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात येण्यासाठी कंबर कसली आहे, तर उद्योजक सतीश पांचगे हेही आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली गट भाजपाकडे राहण्यासाठी व्यूहरचना आखण्यात मग्न आहेत. शिरूर पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण झाल्याने या गटातील गणाच्या मतदारसंघाला कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे तालुक्यातील उमेदवारांना पक्षाची उमेदवारी मिळण्यासाठी राजकीय समीकरणे बदलणार आहे.