शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

महिला सुरक्षेसाठी ‘बडी कॉप’

By admin | Updated: March 25, 2017 03:45 IST

पुणे शहरासह आयटी पार्कमधील महिलांच्या सुरक्षिततेची गरज ओळखून व्हॉट्स अ‍ॅपच्या धर्तीवर बडीकॉप ही संकल्पना

वाकड : पुणे शहरासह आयटी पार्कमधील महिलांच्या सुरक्षिततेची गरज ओळखून व्हॉट्स अ‍ॅपच्या धर्तीवर बडीकॉप ही संकल्पना पुणे शहर पोलिसांच्या पुढाकाराने राबविण्यात येणार आहे. या गु्रपमध्ये ४० महिला आणि एक पोलीस कर्मचारी सक्रिय असणार असून, यामुळे महिलांना तातडीने मदत मिळू शकणार आहे. खराडी, हिंजवडी, हडपसर, मगरपट्टा आदी आयटी पार्कमध्ये एकाच वेळी हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, सोमवारी ग्रुपचा शुभारंभ होणार आहे. हिंजवडी येथील एचआयएच्या (हिंजवडी इंड्रस्टियल असोसिएशन) कार्यालयात आयटीयन्सला माहिती देण्यासाठी एचआयएच्या नोंदणीकृत कंपन्यांतील एचआर व्यवस्थापकांना निमंत्रित करण्यात आले होते. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी ही संकल्पना समजावून सांगितली. अप्पर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, उपायुक्त (सायबर सेल) दीपक साकोरे, गणेश शिंदे, निरीक्षक अरुण वायकर, एचआयएचे सुनील अडवानी, सुरक्षा विभागाचे प्रमुख मयंक गुप्ता, सायबर तज्ज्ञ पंकज घोडे उपस्थित होते. तुमच्या जवळच्या मित्राप्रमाणे हे बडीकॉप मदत करणार आहे. बडीकॉप सभासद महिलेच्या फेसबुक, एसएमएस, कॉल, व्हाट्सअ‍ॅप, ई-मेल, ट्विटर आदी सर्व खात्यात संलग्न असेल. विनाइंटरनेट बॅडीकॉपशी जिथे जाल तिथे २४ तास संपर्कात असेल. बडीकॉप महिलांना संकटात आहोत, असे वाटल्यास आहे त्या ठिकाणी मदत मिळवून देणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले. प्रतिसाद पाहून योजना राज्यात राबवणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)