शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे कँटोन्मेंटमध्येही धावणार सायकली; स्मार्ट सिटीचा उपक्रम, योजनेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 14:19 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, त्यानंतर कृषी महाविद्यालय व आता द्विशताब्दीच्या उंबरठ्यावर असलेल्या खडकी कॅन्टोन्मेट बोर्डमध्येही स्मार्ट सिटी कंपनीच्या सायकली उपलब्ध झाल्या आहेत.

ठळक मुद्देकॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात एकूण ९ ठिकाणी तयार करण्यात आली सायकल स्थानकेअनिल शिरोळे यांच्या हस्ते कॅन्टोन्मेंट मधील या पब्लिक सायकल शेअरिंग योजनेचे उद्घाटन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, त्यानंतर कृषी महाविद्यालय व आता द्विशताब्दीच्या उंबरठ्यावर असलेल्या खडकी कॅन्टोन्मेट बोर्डमध्येही स्मार्ट सिटी कंपनीच्या सायकली उपलब्ध झाल्या आहेत. प्रजासत्ताकदिनाचा मुहूर्त साधून खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते कॅन्टोन्मेंट मधील या पब्लिक सायकल शेअरिंग योजनेचे उद्घाटन करण्यात आले.सायकलींबरोबर कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात एकूण ९ ठिकाणी सायकल स्थानकेही तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे आता एखाद्या नागरिकाने एका स्थानकातून सायकल घेतली तर त्याला काम झाल्यानंतर त्याच्या नजिक असलेल्या सायकल स्थानकावर ती जमा करता येणार आहे. अवघा १ रूपया प्रतितास या दराने या सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अशी माहिती कॅन्टोन्मेंटवासियांना देण्यात आली. पहिल्या टप्प्यात १०० सायकली देण्यात आल्या आहेत.खासदार शिरोळे यांनी उपक्रमाचे कौतूक केले. खडकी परिसर कायम गजबजलेला असतो. सायकल वापराने वाहतूकीची सातत्याने होणारी कोंडी कमी होण्यास मदत होईल. या सामाजिक फायद्याबरोबरच आरोग्य सुधारण्यासारखे वैयक्तिक फायदेही यात बरेच असल्याचे त्यांनी सांगितले व सायकलींचा जास्तीतजास्त वापर करण्याचे आवाहन केले. स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी खडकी कॅन्टोन्मेट बोर्डाला २०० वर्षे पुर्ण होताना अशी अनोखी योजना देत असल्याबद्धल आनंद वाटतो आहे असे सांगितले.कार्यक्रमाला सर्दन कमांडच्या संरक्षण संपदा विभागाचे मुख्य संचालक एल. के. पेगू,  बोर्डाचे उपाध्यक्ष अभय सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप, पेडल या सायकल कंपनीचे व्यवस्थापक आगम गर्ग तसेच खडकी परिसरातील विविध मान्यवर नागरिक उपस्थित होते. स्मार्ट सिटीच्या पब्लिक सायकल शेअरिंग योजनाचा हा तिसरा टप्पा आहे. यापुर्वी विद्यापीठ व कृषी महाविद्यालय येथे चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर तिथे जादा सायकली उपलब्ध करून दिल्या आहेत. खडकीमधील नागरिकांचा प्रतिसाद मिळाला तर इथेही जास्त सायकली देण्यात येतील असे यावेळी गर्ग यांनी सांगितले.  

टॅग्स :Pune Cycle Schemeपुणे सायकल योजनाpune cantonment boardपुणे कॅन्टोन्मेंट बोर्डanil shiroleअनिल शिरोळे