शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

मुंबई मराठा मोर्चाच्या जनजागृतीसाठी लोणावळ्यात बाईकरॅली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 11:19 IST

सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी 9 ऑगस्ट क्रांतीदिन या दिवशी मुंबईत  मराठा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईत होणा-या या मोर्चाबाबत जनजागृती करण्यासाठी लोणावळा शहर व ग्रामीण भागात शनिवारी दुचाकी रॅली काढण्यात आली.

लोणावळा, दि. 5 - सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी 9 ऑगस्ट क्रांतीदिन या दिवशी मुंबईत  मराठा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईत होणा-या या मोर्चाबाबत जनजागृती करण्यासाठी लोणावळा शहर व ग्रामीण भागात शनिवारी दुचाकी रॅली काढण्यात आली.मागील वर्षभर राज्यभरातील विविध शहरांमध्ये मराठा समाजाच्या वतीने अनके मूकमोर्चे काढत शासनाचे लक्ष सकल मराठा समाजाच्या मागण्याकडे वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र शासनाकडून अद्याप मागण्याची दखल घेण्यात आलेली नसल्याने मुंबईत न भुतो ना भविष्य असा विराट मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. 

या मोर्चात जास्तीत जास्त मराठा समाजाने सहभागी व्हावे, याकरिता लोणावळा शहरातील भांगरवाडी राम मंदिर येथून दुचाकी रॅली काढत शिवाजी महाराज चौक, जयचंद चौक, मावळा चौक, गवळीवाडा नाका, वलवण, वरसोली, वाकसई, कार्ला या परिसरात बाईक रॅली काढली.  यावेळी तरुणांनी मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. दोन दिवसांपूर्वी कार्ला गावात सकल मराठा समाजाची नियोजनाची बैठकही झाली होती.

मराठा क्रांती मोर्चा: समन्वयकांचा थेट चर्चेस नकार, मराठा आमदार सरकारसोबत चर्चा करणार

दरम्यान, मराठा समाजाच्या मागणीवरील चर्चा करण्याचे आवाहन करणा-या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना समन्वयकांनी नकार दिला. याउलट गुरुवारी मुंबईतील सकल मराठा समाजाच्या बैठकीत मराठा समाजाचे प्रतिनिधित्त्व करणारे सर्वपक्षीय आमदारच चर्चा करतील, असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जो काही निर्णय असेल, तो सरकारने ८ आॅगस्टपर्यंत विधानसभेत व ९ आॅगस्टच्या मोर्चासमोर जाहीर करावा, असा सर्वानुमते निर्णय झाल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितले.

मराठा समाजाने निवडून दिलेल्या सर्वपक्षीय आमदारांना याआधीच चर्चेसाठी सकल मराठा समाजाने बोलावले होते. त्यासंदर्भातील बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झाली. त्याआधी मराठा समाजाचे नेतृत्त्व करणाºया विविध संघटना, प्रतिनिधी आणि नेत्यांची एक बैठक दादरमध्ये पार पडली. अखेर दोन्ही बैठकांनंतर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, आमदार आणि संघटनांची एक बैठक रात्री उशिरा मुंबईत पार पडली. या तीनही बैठकांनंतर मराठा समाजातर्फे सर्वपक्षीय आमदारच विधानसभा आणि विधानपरिषदेतून मागण्यांवर चर्चा करतील, असा निर्णय घेण्यात आल्याचे एका समन्वयकाने सांगितले.९ आॅगस्टला मुंबईत मराठा क्रांती मूक महामोर्चा कोणत्याही परिस्थितीत धडकणारच, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा