या प्रसंगी इंदापूर पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे, सरपंच तानाजी वायसे, अशोक शिंदे, पराग जाधव,संजय रायसोनी,पिंटू शिंदे,दत्ता धवडे,अमित वाघ,तुषार क्षीरसागर,सत्यवान भोसले,रोहित भरणे,अमोल वाघ,बापू कांबळे, संकेत नगरे,अमोल जाधव, शिवाजी वायसे उपस्थित होते.
हा रस्ता वॉर्ड क्रमांक १ आणि वॉर्ड क्रमांक २ यांच्या सीमारेषेवरील असून अमोल जाधव यांचे घर ते संकेत नगरे यांचे घरापर्यंत रस्ता तयार केला जाणार असून, साधारण ११५ मी. लांबी व चार मीटर रुंदीचा असणार आहे.
या कामाचे भूमिपूजन करून रस्त्याच्या कामास सुरुवात केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. भविष्यातही अशाच प्रकारची विकासकामे नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्य यांच्याकडून होतील, अशी अपेक्षादेखील येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
१९ भिगवण भूमिपूजन
भिगवण येथील नवीन रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी नवनिर्वाचित सदस्य आणि पदाधिकारी.