शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भीमा-पाटसचे सेवानिवृत्त कामगार न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 00:14 IST

वास्तविक पाहता कारखान्याची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यातच सेवानिवृत्त कामगारांसह सध्याच्या परिस्थितीत कामावर असलेल्या कामगारांची देणी द्यावयाची आहेत.

भीमा कारखान्याच्या सेवानिवृत्तांच्या देय रकमांसाठी अनेकदा पाठपुरावा करूनही भीमा कारखान्याकडून पैसे दिले गेले नाहीत. त्यामुळे नाईलाजाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ५ फेब्रुवारीपासून चक्री उपोषण सुरु होते. उपोषण सुरु होऊन १४ दिवस झाले मात्र अद्याप कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल यांनी उपोषणस्थळी सेवानिवृत्त कामगारांची भेट घेतली नाही. याउलट उपोषण स्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कारखान्याच्या विश्रामगृहावर आंदोलकांना चर्चेला बोलावले अशी खंत उपोषणकर्त्या कामगारांची आहे.

वास्तविक पाहता कारखान्याची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यातच सेवानिवृत्त कामगारांसह सध्याच्या परिस्थितीत कामावर असलेल्या कामगारांची देणी द्यावयाची आहेत. अशा परिस्थितीत समन्वयाने प्रश्न सुटू शकतो. मात्र या उपोषणकर्त्यांचा प्रश्न ताटकळत ठेवला जात असल्याची वस्तुस्थिती उपोषणकर्ते कामगारांनी स्पष्ट केली आहे. उपोषणस्थळी कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, पंढरीनाथ पासलकर, विकास शेलार, तुकाराम ताकवणे, या संचालकांनी भेट दिली, पण त्यांच्या हातात आर्थिक कारभार नाही. याउलट ज्यांच्याकडे निर्णय क्षमता आहे ते कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी मात्र उपोषणस्थळी कामगारांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. परिणामी चर्चेसाठी उपोषणकर्त्यांना विश्रामगृहावर बोलावले. त्यानुसार नानासाहेब दिवेकर, सुरेश निंबाळकर, शहाजी जाधव, अशोक शितोळे, बाळासाहेब जगदाळे ही वयस्कर मंडळी वयाचे भान न ठेवता वयाने लहान असलेल्या अध्यक्षांकडे चर्चेसाठी विश्रामगृहावर गेले. तेथेही या कामगारांच्या पदरी निराशा आली. किमान त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी प्रयत्न करू, असे आश्वासनसुद्धा त्यांना मिळाले नाही. उलट कारखान्याचे राजाकारण आणि आर्थिक परिस्थितीचे गाºहाणे ऐकावे लागले.

कारखाना अडचणीत आहे, ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा सेवानिवृत्त कामगार आणि प्रशासन यांनी एकत्र येऊन हा प्रश्न टप्प्याटप्प्यानी का होईना सोडवला पाहिजे. यासाठी ताठर भूमिका महत्त्वाची ठरणार नाही. यासाठी भीमा पाटसच्या प्रशासनाने दोन पावले मागे येऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा करणे महत्त्वाचे आहे. त्यातूनच मार्ग निघेल. उपोषणाच्या पहिल्या दिवशी कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब निभे यांनी भेट दिली. त्यांनी कामगारांबरोबर केलेली चर्चा मात्र निष्फळ ठरली.भीमा सहकारी साखर कारखान्याच्या २१३ सेवानिवृत्त कामगारांच्या देणी संदर्भातील प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्यांना सेवानिवृत्तीनंतरचे मिळणारे अंदाजे ७ कोटी रुपये पैैसे त्यांच्या पदरी पडलेले नाहीत. किंबहुना हक्काचे पैैसे मिळावे म्हणून त्यांनी कारखाना व्यवस्थापनाकडे पाठपुरावा केला. परंतु त्यांच्या पदरी हेंडसाळाच आल्याने नाईलाजास्तव या सेवानिवृत्त कामगारांनी भीमा-पाटस कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ चक्री उपोषण सुरु केले आहे.१६ कामगारांच्या वारसांचे काय?२१३ सेवानिवृत्त कामगारांपैैकी १५ कामगार हयात नाहीत तर गेल्या दोन दिवसांपूर्वी विलास कुलुंगे या कामगाराचा मृत्यू झाला, असे एकूण १६ मयत कामगार आहेत. तेव्हा जिवंत असलेल्या कामगारांची न्याय्य हक्कासाठी हेंडसाळ होत आहे. तर मयत झालेल्या १६ कामगारांच्या वारसांच्या पदरी काय पडणार आहे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Puneपुणे