शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भीमा नदीचा बंधारा कोरडा

By admin | Updated: April 20, 2016 00:45 IST

खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शेलपिंपळगाव परिसरातील भीमा नदीचा बंधारा कोरडा पडला असून, दोन दिवस पुरेल इतकाच निचांकी साठा शिल्लक आहे

शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शेलपिंपळगाव परिसरातील भीमा नदीचा बंधारा कोरडा पडला असून, दोन दिवस पुरेल इतकाच निचांकी साठा शिल्लक आहे. परिणामी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा; तसेच शेतीसिंचनाचा प्रश्न शेतकरीवर्गासमोर उभा राहिला आहे. चासकमान कालवा झाल्यापासून प्रथमच हा बंधारा कोरडा पडण्याच्या मार्गावर असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे चासकमान धरणातून कालव्याद्वारे आवर्तन देऊन हा बंधारा काही अंशी भरून द्यावा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहे. चासकमान डाव्या कालव्याच्या मागील आवर्तनाद्वारे पोटचाऱ्यामार्फत सोडण्यात आलेले पाणी काहीशा प्रमाणात या बंधाऱ्यात आले होते. मात्र, बंधारा पूर्ण क्षमतेने न भरल्यामुळे आवर्तन बंद झाल्यानंतर अगदी काही दिवसांतच परिसरात पाण्याचा ठणठणाट झाला. या बंधाऱ्याच्या पाण्यावर परिसरातील शेतकऱ्यांचे विद्युत पंप अवलंबून असून, पाणी संपल्याने ते बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. खेडच्या पूर्व भागातील बहुतांशी गावे चासकमान डाव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. चासकमानच्या डाव्या कालव्याला आवर्तन मिळाल्यानंतर परिसरातील पोटचाऱ्यामार्फत ते विविध ठिकाणच्या पाणीस्रोतांना वितरित केले जाते. परंतु, या हंगामात पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने पोटपाट कोरडे ठणठणीत पडले आहेत.परिणामी परिसरातील विहिरी, तलाव, नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्यांचे पाणी पातळी निच्चाकी पातळीवर आली आहे.