शहरं
Join us  
Trending Stories
1
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
2
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
3
३ महिन्यांमध्ये १००० कोटी रुपयांचा फायदा; चांदीच्या किमतीनं 'यांना' केलं मालामाल
4
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
5
जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने केला महिलेवर ॲसिड हल्ला, तीन महिन्यांपूर्वी दाखल केला होता गुन्हा
6
मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिलेलाच नाही! राऊतांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले, "अजून ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच"
7
अतिवृष्टीने खरीप गेला; रब्बीचा हंगाम देणार हात; धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने यंदा पेरा ६५ लाख हेक्टरवर जाणार 
8
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?
9
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
10
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
11
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
12
काय सत्य अन् काय स्वप्न! गूढ वाढवणारा 'असंभव' सिनेमाचा टीझर पाहिलात का?
13
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
14
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
15
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
16
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
17
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
18
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
19
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
20
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले

प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2024 21:15 IST

- वाजत-गाजत निघणार बाप्पाची मिरवणूक

पुणे: हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या हस्ते होणार शनिवारी (दि. ७) दुपारी साडेबारा वाजता होणार आहे., त्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात आणि जंगी मिरवणूक देखील निघणार आहे.

मंडळाचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, गणेश चतुर्थीला सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी बाप्पाची  आरती होईल. त्यानंतर मिरवणुकीला सुरवात होईल. सुरवातिला लाठीकाठी मर्दानी खेळ व शंखनाद होईल. त्यांनतर सात पथकांकडून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनासमोर ढोल-ताशांची सलामी दिली जाणार आहे. शिवमुद्रा, वाद्यवृंद, मानवंदना, श्री, नु म वी, कलावंत, श्रीराम ही सात ढोल ताशा पथके बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी असणार आहेत. या सर्व पथकांच्या वादन मिरवणुकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाचे वाजत गाजत आगमन होणार आहे. विशेष म्हणजे १३२ वर्षानंतर प्रथमच यावर्षी बाप्पाच्या रथाला बैलजोडी न लावता  कार्यकर्ते हा रथ ओढणार आहेत.  दुपारी साडेबारा वाजताच्या मुहर्तावर प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कार्यक्रम होतील असे पुनीत बालन यांनी सांगितले.दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची वाजत-गाजत मिरवणुकीनंतर प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या प्राणप्रतिष्ठा होणार आहे.  तरी सर्व गणेश भक्तांनी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहावे ही विनंती. - पुनीत बालन, उत्सव प्रमुख व विश्वस्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवganpatiगणपती 2024Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीPuneपुणे