भोर तालुक्यात संततधार सुरु आहे. भाटघर धरण भागात १७ मिलीमीटर तर एकुण ४७० मिलीमीटर पाऊस होऊन धरण ६५.३१ टक्के भरले आहे. मागच्या वर्षी ३८ टक्केच धरण भरले होते. तालुक्याच्या पश्चिम भागातील हिर्डोशी
खोऱ्यातील निरादेवघर धरण भागात आज ४० मिलीमीटर तर एकुण १ हजार ५९९ मिलीमीटर पाऊस झालेला आहे. धरण ९०.६९ टक्के भरले आहे. गतवर्षी धरण २४ टक्केच भरले होते. चापेट गुंजवणी धरण भागात मंगळवारी ४४ मिलीमीटर पाऊस झाला. आतापर्यंत धरणक्षेत्रात एकुण १ हजार २२६ मिलीमीटर पाऊस झाला. धरण ९० टक्के भरले आहे.
वीर धरण परिसरात भागात मंगळवारी ० मिलीमीटर तर एकुण २४१ मिलीमीटर पाऊस झाला. धरण ९५.३२ टक्के भरले आहे. तालुक्यात पावसाची संततधार सुरुच असल्यामुळे धरण भागातील पाण्याची पातळी झपट्याने वाढत आहे.
फोटो :