शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा फिल्मीस्टाईल २७ लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 02:44 IST

पेट्रोल पंपावर जमा झालेले २७ लाख ६० हजार रुपये बँकेत भरण्यासाठी घेऊन जात असताना दोन दुचाकीवरून आलेल्या दोन

पुणे : पेट्रोल पंपावर जमा झालेले २७ लाख ६० हजार रुपये बँकेत भरण्यासाठी घेऊन जात असताना दोन दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यावर डल्ला मारला आहे. बिबवेवाडी-कोंढवा रोडवरवरील लाईट हाऊससमोर सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता हा प्रकार घडला. भरदिवसा व रहदारीच्या रस्त्यावर हा प्रकार घडल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.याप्रकरणी अ‍ॅन्थनी बर्मन (वय ४५, रा. मार्केट यार्ड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सर्व रक्कम नसरवाण पेट्रोल पंपाची होती. पंपाचे दोन कर्मचारी हे पैसे बँकेत भरण्यासाठी घेऊन जात असता घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बर्मन हे धनकवडी भागातील शंकरमहाराज मठाशेजारी असणाऱ्या नसरवाण पेट्रोल पंपावर कामास आहेत. सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मॅनेजर गजानन पवार यांनी कामगार अजय परदेशी (वय ४४, रा. धनकवडी) यांना बोलावले व त्यांना ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले पैसे काढण्यास सांगितले. पवार यांनी संबंधित रक्कम एका काळ्या रंगाच्या स्कूल बॅगमध्ये भरली. तसेच, परदेशी यांना फिर्यादी अ‍ॅन्थनी बर्मन यांना सोबत घेऊन भवानी पेठेतील बँक आॅफ इंडियाच्या भरण्यास सांगितले. त्यानुसार, परदेशी व बर्मन कारने पैशांची बॅग घेऊन निघाले. बर्मन हे कार चालवत होते. ते घटनास्थळी आले असता सीबीझेडवरून आलेल्या एकाने कारला दुचाकी आडवी लावून खाली पाडले. त्यामुळे बर्मन यांनी कार थांबवली. त्यानंतर दुचाकीस्वाराने परदेशी यांच्यावर हल्ला करून बॅग चोरली. तोच बॅग घेऊन थोड्या अंतरावर दुचाकीवर उभ्या असलेल्या व्यक्तीसोबत फरार झाला. बर्मन यांनी खाली उतरून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत ते पसार झाले. घटनेची माहिती मिळताच मार्केट यार्ड व बिबवेवाडी पोलिसांनी आणि गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी धाव घेतली. याप्रकरणी अधिक तपास मार्केट यार्ड पोलीस करीत आहेत.