शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

भोरला टंचाईग्रस्त गावांची थट्टा!

By admin | Updated: May 30, 2017 02:15 IST

पावसाळा सुरू होत आला तरी पंचायत समितीत टंचाई कक्षच नाही. प्रभारी उपअभियंताही आठवड्यातून एकदाच फक्त मंगळवारीच हजर

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : पावसाळा सुरू होत आला  तरी पंचायत समितीत टंचाई कक्षच नाही. प्रभारी उपअभियंताही आठवड्यातून एकदाच फक्त मंगळवारीच हजर असतात. त्यामुळे तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांनी आपली व्यथा मांडायची तरी कुठे व कोणाकडे, असा संतप्त सवाल आता ग्रामस्थ करीत आहेत. टँकरबाबत आमची थट्टा सुरू असल्याची व्यथा ते मांडत आहेत.ग्रामीण पाणीपुरवठा विभाग म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी आवस्था झाली आहे.तालुक्यातील भाटघर व नीरादेवघर धरणातील पाणीसाठी अत्यल्प झाल्याने १० गावे आणि १३ वाड्यांनी टँकर मागणीचे प्रस्ताव भोर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागात सादर केले आहेत. त्यापैकी ३ टँकर व २ पिकअप जीप मंजूर करून टंचाईग्रस्त गावातील लोकांची बोळवण केली आहे.टंचाईबाबत ग्रामस्थ पाणीपुरवठा विभागात आल्यास प्रभारी उपअभियंता आठवड्यातून एकदाच येत असल्यामुळे त्यांचे दर्शनच होत नाही तर शाखा अभियंता फिरतीवर असल्याचे सांगितले जाते. यामुळे येथील एखाद्या लिपिकाशी बोलून सरपंच, ग्रामस्थ किंवा ग्रामसेवकाला घरचा रस्ता धरावा लागतो. मंगळवारशिवाय पाणीपुरवठा विभागातील कोणताच अधिकारी भेटत नाही. शिवाय पुण्याला मीटिंग असली तरी तेही शक्य होत नसल्याचे भगवान कंक यांनी सांगितले. अनेक गावातील टंचाई, एकात्मिकसाठी व नवीन योजना करण्यासाठी अंदाजपत्रकासाठी सहा-सहा महिने वारंवार हेलपाटे मारावे लागतात.तर काम झाल्यावर एम. टी (मूल्यांकन) करण्यासाठी येथील शाखा अभियंता ढाब्यावर जेवण व आर्थिक तरतूद प्रथम केल्यावरही वारंवार हेलपाटे मारुन वेळवर एम. बी. मिळतच नाही. सहा सहा महिने पैसे काढता येत नसल्याने अनेक पाणीपुरवठा योजना तीन ते चार वर्षे होऊनही पूर्ण झालेल्या नाहीत. त्याचाही परिणाम टंचाईवर होत आहे. संबंधित शाखा अभियंत्यांकडून कामे वेळेवर होत नसल्याने ठेकेदार व सरपंच यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे सरपंच सांगतात. येथील काही शाखा अभियतंत्यांना अनेक वर्षे झाल्याने ते सरपंच नागरिक व ग्रामसेवकांची पिळवणूक करीत आहेत. त्यांच्यावर प्रभारी उपअभियंत्यांचा अंकुश नाही. त्यामुळे त्यांची बदली करण्याची मागणी होत आहे.