शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विश्वासघात करणा:यांना धडा शिकवा

By admin | Updated: October 11, 2014 23:35 IST

पुरंदरच्या लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत जनतेचा विश्वासघाताच केला. विकासकामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू द्यायची नाहीत, अशी घातक प्रवृत्ती आहे.

सासवड : पुरंदरच्या लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत जनतेचा विश्वासघाताच केला. विकासकामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू द्यायची नाहीत, अशी घातक प्रवृत्ती आहे. काँग्रेस पक्षाला आत्तापर्यंत उमेदवार देण्याची संधी नव्हती. यावेळी मात्र संजय जगताप यांच्या रूपाने काँग्रेसचा उमेदवार आहे. काँग्रेसला
निवडून आणण्याची ऐतिहासिक संधी पुरंदरच्या मतदारांना आहे. या निवडणुकीत इतिहास घडेल, अशी माझी खात्री आहे. पुरंदरच्या जनतेचा  विश्वासघात करणा-यांना आता ही जनता धडा शिकवेल, असा विश्वास महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला.
माळशिरस  (ता. पुरंदर) येथे झालेल्या काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. शिवसेना, भाजपा यांची मुख्यमंत्री कोण होणार यावरून भांडणो सुरू आहेत. राष्ट्रवादीने सिंचन घोटाळा करून शेतक-यांची वाट लावली. परंतु, आता या घोटाळ्यावर भाजप - शिवसेना बोलत नाहीत. याचाच अर्थ यांच्यामध्ये काहीतरी सेटिंग झाली आहे असा होतो. स्थानिक आमदार माङयावरही टिका करतात, असे मला समजले. पक्षाने आदेश दिल्यामुळे मी पुणो शहरातून निवडणूक लढविली. परंतु, यांनी मात्र निवडणुकीपूर्वी फक्त गाजावाजा केला व नंतर तडजोड करून गप्प बसले. अशी प्रवृत्ती पुरंदरमधून घालवून देण्याची ही संधी आहे. यासाठी सासवडमध्ये विकासकामे केलेल्या संजय जगताप यांनाच निवडून द्यावे, असे आवाहनही डॉ विश्वजीत कदम यांनी केले.
संजय जगताप यांनी पुरंदर उपसा योजना या दोन महिन्यातच शेतक-यांच्या सोसायटय़ा करून त्यांच्या ताब्यात देणार असल्याचे सांगून पुरंदर उपसा योजना नीट चालवत नाहीत, योजनेच्या पाण्याचे चारपट पैसे घेतात. ही परिस्थिती मी बदलणार आहे असे सांगितले. एक आजी आमदार, एक
माजी आमदार व एक माजी आमदारांची कन्या असे तीन उमेदवार माङयासमोर उभे आहेत. यांना स्वत: चे गावदेखील सुधारता आले नाहीच; परंतु, ते देखील गावी राहिले नाहीत. विकासावर बोलण्याऐवजी ते माङयावर व्यक्तिगत टीका करीत सुटले आहेत. पण, पुरंदर - हवेलीतील जनतेला त्यांचा खोटारडेपणा समजला असल्यामुळे ते आता यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत, याचा मला विश्वास आहे, असेही जगताप यावेळी म्हणाले.
यावेळी नायगाव, चांबळी येथील कार्यकत्र्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष गणोश मेमाणो यांनी प्रास्ताविक
केले. बाळासाहेब कड यांनी सूत्रसंचलन केले तर बारामती लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. सचिन दुर्गाडे यांनी आभार मानले. याप्रसंगी जि.
प. सदस्या मनीषा काकडे, पं. स. सदस्य दत्ता झुरंगे, प्रदीप पोमण, नंदकुमार जगताप, देवा नाझीरकर, मंदार गिरमे, माउली यादव, गणोशकाका जगताप, एकनाथ यादव, नरेंद्र जगताप, वैशाली बोरावके, संभाराजे जगताप, भैया महाजन यांसह माळशिरस व परिसरातील नागरिक, कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
4सासवड : पुरंदर हवेलीचे कॉँंग्रेस पक्षाचे उमेदवार संजय जगताप यांच्या प्रचारासाठी कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी व मुख्यमंत्नी पृथ्वीराज चव्हाण यांनी सभा घेतली. या वेळी  त्यांनी संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली सासवड नगर परिषदेचे काम उत्कृष्ट चालले असून महाराष्ट्रात ‘क’ वर्ग नगर परिषदेत ही नगरपालिका पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगितले. राहुल गांधी यांनी सोपानकाका बँक, शिवाजी शिक्षण मंडळ, पुरंदर नागरी पतसंस्था, पुरंदर मिल्क या संस्थांच्या कामातून तरुणांना रोजगार मिळाल्याचेही आवर्जून सांगितले. तसेच या मतदार संघाचा सासवडप्रमाणो विकास करण्यासाठी जगताप यांना निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले. संजय जगताप यांच्या कार्याची वरिष्ठ पातळीवर दखल घेतल्याचे दिसते, असे सासवड नगरपरिषदेचे उपाध्यक्ष सुहास लांडगे यांनी सांगितले.