शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘बेटी बचाओ’ चळवळ साता समुद्रापार नेणारा अवलिया .. झांबियामध्ये केले रॅलीचे आयोजन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 19:36 IST

हे आंदोलन आता भारतापूरतेच मर्यादित न राहता बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, आणि अरब राष्ट्रातही पसरले आहे.

मांजरी : बेटी बचाओ चळवळीने भारतात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. या सोबतच चळवळीने स्त्री जन्माचा आदर आणि त्यांचे समाजातील स्थान आहे अधोरेखित केले. तसेच स्त्री विषयीची मानसिकता बदलण्यातही या चळवळीचा मोठा वाटा आहे... परंतु या चळवळीने साता समुद्रापार आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. ही चळवळ साता समुद्रापार पोहचविणाऱ्या अवलियांचे नाव आहे डॉ. गणेश राख...

  ''मुलींना वाचवून सन्मान द्या, तिला जगवा; जगाला वाचवा'', अशा आशयाच्या घोषणा देत लुसाका, झांबिया (आफ्रिका) येथील नागरिकांनी बेटी बचाओ जन आंदोलनाचे स्वागत केले आहे. डॉ. गणेश राख यांनी भारतात सुरू केलेल्या या आंदोलनाने झांबियातील सामाजिक चळवळीही प्रेरित झाल्या असून डॉ. राख यांच्या उपस्थितीत त्यांनी नुकतेच रॅलीचे आयोजन करून 'बेटी बचाओ' चे रणशिंग फुंकले आहे. झांबियासह अफ्रिकेतील अनेक देशात मुलींबाबतची मानसिकता दुय्यम आहे. डॉ. गणेश राख यांनी भारतात सुरू केलेल्या 'बेटी बचाओ' जन आंदोलनाला मिळत असलेला प्रतिसाद आणि यश लक्षात घेऊन तेथील सामाजिक चळवळींनी त्याबाबत काम करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी डॉ. राख व त्यांच्या सहकाऱ्यांना निमंत्रित करून 'बेटी बचाओ' जन आंदोलनाची मशाल तेथे पेटविण्यात आली आहे. या कृतीने संपूर्ण जगाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधण्याचा प्रयत्न केला आहे.  आठ वर्षांपूर्वी डॉ. गणेश राख यांनी पुणे येथून 'बेटी बचाओ' जन आंदोलनाची सुरुवात केली आहे. हे आंदोलन आता भारतापूरतेच मर्यादित न राहता बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, आणि अरब राष्ट्रातही पसरले आहे. झांबियाच्या रूपाने या आंदोलनाने आता आफ्रिका खंडातही प्रवेश केला आहे.     सध्या हे जन आंदोलन आंतरराष्ट्रीय व सोशल मीडियामध्ये खूपच चर्चिले जाऊ लागले आहे. त्यामुळेच झांबिया या देशातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन या आंदोलनाची सुरुवात झांबियामध्ये करण्याचे ठरविले. त्यासाठी आयोजित रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातील कार्यकर्यांना निमंत्रित करण्यात आले होते. माँशिबुकेनी कम्युनिटी बेसड ऑर्गनायझेशन यासारख्या संस्थांसह वेटी टेम्बो, कीथ सिएम, माँशिबुकेनी, शशिकांत सूळ, डॉ. लालासाहेब गायकवाड, डॉ. शिवदीप उंद्रे, शीतलदेवी मोहिते पाटील अशा हजारो कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन झांबियामध्ये या आंदोलनाची सुरुवात केली आहे. 

टॅग्स :Manjriमांजरी