शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

"बेशिस्त पार्किंगच्या छायाचित्राला मिळणार बक्षीस"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 05:32 IST

पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची गरज आहे. पार्किंगला जागा उपलब्ध नसून बेशिस्तपणा वाढला आहे.

पुणे : पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची गरज आहे. पार्किंगला जागा उपलब्ध नसून बेशिस्तपणा वाढला आहे. या बेशिस्तीला आवर घालण्यासाठी पुढील काळात बेशिस्तपणे वाहन लावल्याचे छायाचित्र काढून पाठविणाऱ्यास दंडापैकी २० टक्के रक्कम बक्षीस म्हणून देण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी कायदा केला जाणार असल्याचे सुतोवाच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.सिम्बायोसिस स्किल्स अ‍ॅण्ड ओपन युनिव्हर्सिटीच्या वतीने किवळे येथे ‘लॉजिस्टिक, ट्रान्सपोर्टेशन आणि एमएसएमई क्षेत्रातील संधी’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. लॉजिस्टिक स्किल कौन्सिल (एलएससी) चे परिषदेला सहकार्य होते. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रो-कुलगुरू डॉ. स्वाती मुजूमदार,डॉ. श्रवण कडवेकर, डॉ. रामानुजन आदी उपस्थित होते. गडकरी यांच्या हस्ते यावेळी रस्ते सुरक्षा आणि अपघात संशोधनासाठी नव्याने उभारलेल्या ‘जे पी रिसर्च सेंटर आॅफ एक्सलन्सचे’ चे उद्घाटन झाले.देशातील पार्किंगच्या गंभीर स्थितीविषयी गडकरी यांनी चिंता व्यक्त केली. तसेच या समस्येवर मात करण्यासाठी उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, कमी जागेत अधिक वाहनांचे पार्किंग करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परिवहन विभागाच्या सर्वेक्षणानुसार देशात राज्य शासनाच्या सहकार्याने दोन हजारांहून अधिक बस पोर्ट उभारता येऊ शकतात. बसस्थानकांमधील मोठ्या प्रमाणावरील जागेचा वापर त्यासाठी करता येईल. याचा उपयोग बसस्थानकांसह इतर दळणवळणाच्या सोयींना जोडण्यासाठीही करता येणार आहे. तसेच विविध कार्यालये, दुकाने, बँका आदी व्यावसायिक कारणांसाठी बसपोर्टचा उपयोग होईल. नॅशनल हायवे अ‍ॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून दिल्लीतील आपल्या कार्यालयासमोर ‘ईझी पार्क’ ही स्वयंचलित कार पार्किंग इमारत उभारली. अशाप्रकारच्या ५० पेक्षा अधिक इमारती मोठ्या शहरांमध्ये उभारण्यात येत असल्याचे गडकरी म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी