सहारा फाउंडेशनच्या वतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:12 AM2021-09-14T04:12:45+5:302021-09-14T04:12:45+5:30

बारामती : सहारा फाउंडेशनच्या वतीने सर्वसामान्यांसाठी मोफत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. मोरगाव रस्ता येथील, एकता इंग्लिश ...

On behalf of Sahara Foundation | सहारा फाउंडेशनच्या वतीने

सहारा फाउंडेशनच्या वतीने

googlenewsNext

बारामती : सहारा फाउंडेशनच्या वतीने सर्वसामान्यांसाठी मोफत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. मोरगाव रस्ता येथील, एकता इंग्लिश मीडियम स्कूल लसीकरण केंद्राचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.

या वेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, वैद्यकीय अधिकारी मनोज खोमणे, वैद्यकीय अधीक्षक सदानंद काळे, सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष संभाजी माने, माजी नगरसेवक अनिल कदम,मुस्लिम बँकेचे संचालक आल्ताफ सय्यद, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती हाजी कमरुद्दीन सय्यद, विलास बोरावके, शेवंतीलाल दोशी, डॉ. संदेश शहा आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. या लसीकरण केंद्रातून आज, मोरगाव रोड, सिकंदर नगर, खंडोबानगर तसेच कसब्यातील २०० नागरिकांचे पहिल्या दिवशी लसीकरण करण्यात आले अशी माहिती सहारा फाउंडेशनचे अध्यक्ष परवेज हाजी कमरूद्दिन सय्यद यांनी दिली.

बारामतीत सहारा फाउंडेशनच्या वतीने सर्वसामान्यांसाठी मोफत लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे.

१३०९२०२१ बारामती—०१

Web Title: On behalf of Sahara Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.