शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
3
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
4
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
5
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
6
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
7
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
8
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
9
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
10
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
11
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
12
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ
13
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल
14
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
15
Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
16
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
17
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
18
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
19
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
20
गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल

पुरंदर उपसा योजनेतून चार दिवसांनंतर पाणी सोडण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 22:53 IST

दिवाळीच्या सुटीत होती योजना बंद : वाघापूरला पोहोचले पाणी, दुष्काळात ठरणार फायदेशीर

भुलेश्वर : पुरंदर तालुक्याला वरदान ठरणारी पुरंदर उपसा जलसिंचन योजना दिवाळी सुट्टीनंतर पुन्हा सुरू करण्यात आली. योजनेचे पाणी वाघापूर येथील पंप गृहाजवळ दुपारी सव्वा बारा वाजता आले. चार दिवसांनंतर योजना सुरू झाल्याने पाण्याची मागणी केलेल्या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

पुरंदर तालुक्यात दिवसेंदिवस दुष्काळी परिस्थिती वाढू लागली आहे. त्यात पुरंदरच्या पूर्व भागात तर तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागायचा. मात्र, पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरू झाली आणि काही अंशी दुष्काळीची तीव्रता कमी झाली. त्यात ८१ टक्के वीजबिलाचा वाटा सरकारने उचलल्याने फक्त १९ टक्के वीजबिल लाभार्थी गावातील शेतकºयांना भरावे लागत आहे. यामुळे सध्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे.

पुरंदर उपसा जलसिंचन योजनेने पुरंदर तालुक्यातील १४ हजार ४५०, दौंड तालुक्यातील ३ हजार ७६०, हवेली तालुक्यातील ८९०, तर बारामती तालुक्यातील ६ हजार ४९८ असे २ लाख ५६ हजार ४९८ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले आहे. सध्या या योजनेचे दोन पंप सुरू असून ४ हजार ५०० लिटर पाणी प्रति सेकंदाला मिळत आहे. सध्या रब्बी हंगामातील पाणी सुरू आहे. या योजनेचे पाणी मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकºयांकडून रितसर अर्ज भरुन घेण्यात येत आहेत. दिवसेंदिवस दुष्काळी परिस्थिती वाढू लागली आहे. आता कसेबसे जगण्यासाठी पुरंदर उपसा जलसिंचन योजना हाच एक पर्याय उरला आहे. सध्या मागणी वाढल्याने लाभार्थी शेतकºयांना पाणी मिळण्यास उशीर होत आहे. यामुळे ही योजना एकही दिवस बंद राहणार नाही याची सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे. यामुळे मागणीनुसार प्रत्येक शेतकºयांना लवकरात लवकर पाणी मिळेल.टंचाईमधून पाणी सोडणे गरजेचे४पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरू झाल्यापासून पुरंदर तालुक्यातील पिण्याच्या टँकरची संख्या कमी झाली आहे. गावातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गावचे सरपंच, उपसरपंच पाण्याचे पैसे भरून गावाजवळील तलाव बंधारे भरुन घेत आहेत. यामुळे गावच्या सार्वजनिक विहिरी, कुपनलिका यांची पाण्याची पातळी वाढत आहे. यामुळे टँकरची मागणी करण्यापेक्षा पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरळीत चालू राहणे गरजेचे आहे. सध्या पुरंदर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने टंचाईतून पुरंदर तालुक्याला मोफत पाणी मिळण्याची मागणी लाभार्थी गावातीलशेतकºयांनी केली आहे.सध्या पाण्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकरी या पाण्याकडे टक लावून बसला आहे. सर्वसामान्यांना सुरळीत पाणी देण्यासाठी काहीही झाले तरी ही योजना एकही दिवस बंद राहता कामा नये, तसे आदेश महाराष्ट्रचे जलसंपदा व जलसंधारण मंत्री विजय शिवतारे यांनी पंपहाऊसवर झालेल्या शेतकरी व अधिकारी यांच्या आढावा बैठकीत दिले होते. 

टॅग्स :PuneपुणेFortगड