शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

घरच्यांचा, सहकाऱ्यांचा पाठिंबा आणि योग्य नियोजनामुळे यश - तेजस्विनी सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 01:50 IST

घरच्यांचा व सहकाºयांचा पाठिंबा आणि सरावादरम्यान केलेले योग्य नियोजन यामुळे गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकू शकले, असे महाराष्ट्राच्या ‘गोल्डन गर्ल’ तेजस्विनी सावंतने सांगितले.

पुणे - घरच्यांचा व सहकाºयांचा पाठिंबा आणि सरावादरम्यान केलेले योग्य नियोजन यामुळे गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्टÑकुल स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकू शकले, असे महाराष्ट्राच्या ‘गोल्डन गर्ल’ तेजस्विनी सावंतने सांगितले.भारतमाता की जय, जय शिवाजी जय भवानी, वंदे मातरम् या घोषणांनी रविवारी पुणे येथील आंतरराष्टÑीय विमानतळावर सुवर्ण व रौप्य पदकविजेत्या तेजस्विनी सावंतचे जल्लोषात स्वागत झाले. या घोषणा सुरू असतानाच तिचे आगमन झाल्यावर तिने वरील वक्तव्य केले. तेजस्विनी म्हणाली की, सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा असल्यामुळे मी ही दोन पदके जिंकण्याची कामगिरी करू शकले. सुरुवातीला मनात जरा हुरहूर होती; कारण बºयाच वर्षांनी मी मोठ्या आंतरराष्टÑीय स्पर्धेत सहभागी होत होते. पण एकदा स्पर्धा सुरू झाली आणि मनावरचे दडपण नाहीसे झाले. कारण जिद्द होती पदक जिंकण्याची. या स्पर्धेच्या तयारीदरम्यान माझे पती व सासू यांच्यासह घरातील सर्व मंडळी आणि क्रीडाक्षेत्रातील सर्व सहकाºयांच्या सहकार्यामुळे हे यश संपादन करू शकले. सध्या क्रीडाक्षेत्राला चांगले प्रोत्साहन मिळत आहे. वैयक्तिक, सामाजिक आणि शासनस्तरावरून चांगले सहकार्य केले जात आहे.उदयोन्मुख खेळाडूंना काय सांगशील, असे विचारल्यावर तेजस्विनी म्हणाली, ‘‘त्यांनी आपले गुरू आणि आईवडिलांवर डोळे झाकून विश्वास ठेवावा; कारण ते आपले कधीच वाईट इच्छित नाहीत. ते जे काही मार्गदर्शन करतात ते आपल्या चांगल्यासाठीच असते.’’विमानतळावर तिच्या स्वागतासाठी तेजस्विनीचे पती समीर दरेकर, आई सुनीता सावंत, बहीण अनुराधा पित्रे, सासू कमल दरेकर, राज्याचे सहसंचालक नरेंद्र सोपल, सहायक संचालक सुधीर मोरे, माजी ज्युनिअर जागतिक नेमबाज विजेता नवनाथ फडतरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :PuneपुणेCommonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८