शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सूर्याला अमावस्येचा स्पर्श होत नसल्यामुळे जेजुरीत भरणारी सोमवती यात्रा रद्द 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 21:09 IST

सोमवारी (दि. ८) सकाळी ११ वाजून ३२ मिनिटांनी अमावस्या सुरू होत असून, मंगळवारी ही अमावस्या पंचांगात दाखविण्यात आली आहे. तसेच बुधवारी प्रतिपदा असल्याने सोमवती यात्रा भरणार की नाही, याबाबत मोठी चर्चा ग्रामस्थांमध्ये होती.

ठळक मुद्देजेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा भरणार नसल्याचा ग्रामस्थांचा निर्णय

जेजुरी : जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा सोमवारी (दि. ८)  भरणार नसल्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यादिवशी सकाळी ११ वाजून ३२ मिनिटांनी अमावस्या सुरू होत असून ती मंगळवारी (दि. ९) ९ वाजून २७ मिनिटांनी संपते. सोमवारी उगवत्या सूर्याला अमावस्येचा स्पर्श होत नसल्याने देवाचा पालखी सोहळा काढण्यात येणार नाही. त्यामुळे सोमवती यात्रा भरणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवती यात्रेच्या नियोजनासाठी जेजुरी येथील ऐतिहासिक छत्री मंदिरात पालखी सोहळ्याचे मानकरी, खांदेकरी व ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष गणेश आगलावे, प्रमुख मानकरी राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, रमेश राऊत, छबन कुदळे, अरुण खोमणे, सुरेंद्र नवगिरे, कृष्णा कुदळे, पंडित हरपळे, दिलावर मणेर, गणेश डिखळे, दत्तात्रय सकट, दिलीप मोरे, शिवाजी शिंदे, रवींद्र झगडे, नगरसेवक महेश दरेकर, पुरोहित शशिकांत सेवेकरी, श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे, माजी विश्वस्त राजेंद्र बारभाई, तसेच खंडोबा पालखी सोहळ्याचे, खांदेकरी, मानकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. सोमवारी (दि. ८) सकाळी ११ वाजून ३२ मिनिटांनी अमावस्या सुरू होत असून, मंगळवारी ही अमावस्या पंचांगात दाखविण्यात आली आहे. तसेच बुधवारी प्रतिपदा असल्याने सोमवती यात्रा भरणार की नाही, याबाबत मोठी चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. या बैठकीत सर्व पालखी सोहळ्याचे मानकरी, खांदेकरी व ग्रामस्थ यांची चर्चा झाली. पालखी सोहळ्याची मागील रुढी, परंपरा पहाटे सूर्याला अमावस्येचा स्पर्श होत नसल्याने, तसेच रविवारी पालखीसाठी शेडा देता येत नसल्याने, घटस्थापना बुधवारी होत असल्याने पालखी सोहळा काढता येणार नाही, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानंतर प्रमुख मानकरी राजेंद्र पेशवे यांनी सोमवारी सोमवती यात्रा भरणार नसल्याचे जाहीर केले.या बैठकीत देवसंस्थानने घटनादुरुस्तीसाठी धमार्दाय आयुक्त कार्यालयात अर्ज केला असून सण, उत्सव, गावाच्या परंपरा, मानकरी, खांदेकरी यांचे हक्क कायम अबाधित ठेवावेत, तसेच ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच घटना दुरुस्त करावी, अशी मागणी केली. खंडोबा देवाच्या घोड्यासाठी पागा बांधण्याचा अनेक दिवसांपासून प्रश्न प्रलंबित होता. गडाच्या पायथ्याशी कडेपठार रस्त्यालगत या पागेसाठी खंडोबाभक्त संतोष खोमणे यांनी पाच गुंठे जागा देणार असल्याचे या बैठकीत जाहीर केले. 

टॅग्स :JejuriजेजुरीKhandoba Yatraखंडोबा यात्रा