शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
3
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
4
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
5
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
6
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
7
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
8
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
9
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
10
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
11
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
12
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
13
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
14
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
15
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
16
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
17
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
18
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
19
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
20
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश

तांदळाच्या आकारात साकारले काश्मीरचे सौंदर्य; विक्रमाची नोंद भारत बुक आॅफ वर्ल्ड मध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 11:59 IST

तांदळाच्या आकारात काश्मीरचे सौंदर्य कॅनव्हासवर उतरविण्याचा विक्रम सोपान खंडागळे या अवलिया चित्रकाराने केला आहे. याची नोंद भारत बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देकलाक्षेत्रातील मुकेश कणेरी यांच्या हस्ते सोपान खंडागळे यांचा सन्मानसोपान बुलडाण्यातील निमगावचे असून, नोकरीनिमित्त सध्या सुरतमध्ये स्थायिकआतापर्यंत बेटी बचाव, स्वच्छता अभियान आदी संकल्पनांवर रेखाटली चित्रे

पुणे : अंगठ्याच्या नखावर बोटांनी हळुवार रंगभरण करीत तांदळाच्या आकारात काश्मीरचे सौंदर्य कॅनव्हासवर उतरविण्याचा विक्रम सोपान खंडागळे या अवलिया चित्रकाराने केला आहे. त्याच्या या विक्रमाची नोंद सर्वात लहान चित्र म्हणून भारत बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक केंद्रातील राजा रवी वर्मा कलादालनात जयहिंद परिवार आणि लाईफस्टार ग्लोबल रिसर्च फाउंडेशतर्फे आयोजित कलाकार राष्ट्रीय संमेलनात सोपान खंडागळे यांनी प्रात्यक्षिक केले. त्यांच्या विक्रमाची नोंद करण्यात आली. कलाक्षेत्रातील मुकेश कणेरी यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जयहिंद परिवाराचे नारायण फड उपस्थित होते. सोपान खंडागळे म्हणाले, ज्येष्ठ कलाकार इफ्तिकार अहमद राजा यांचे ८-१० वर्षांपूर्वी मी चित्र पाहिले होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेत मी हा फिंगरआर्ट कलेचा छंद जोपासला आहे. जागतिक विक्रम करणे हे माझे स्वप्न होते. ते आता पूर्ण झाले आहे. यातूनच आता उपजीविकेचा मार्ग शोधणार आहे. आतापर्यंत बेटी बचाव, स्वच्छता अभियान आदी संकल्पनांवर चित्रे रेखाटली आहेत. फिंगरप्रिंट आर्टमधून चित्र काढणारे खंडागळे यांनी तांदळाच्या दाण्याएवढे पेंटिंग काढले. त्यांच्या पेंटिंगची संकल्पना काश्मीरचे निसर्गसौंदर्य ही होती. सोपान खंडागळे बुलडाण्यातील नांदुरा तालुक्यातल्या निमगावचे असून, नोकरीनिमित्त ते सध्या सुरतमध्ये स्थायिक आहेत. पेंटिंग करणे त्यांचा आवडता छंद असून, त्यांनी तो जिद्दीने जपला आहे. 

टॅग्स :Puneपुणे