पुणे : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा प्रतिष्ठित ‘बाया कर्वे पुरस्कार’ यंदा अरुणाचल प्रदेशच्या सामाजिक कार्यकर्त्या जया तासुंग मोयोंगो यांना जाहीर करण्यात आला. येत्या २९ नोव्हेंबरला संस्थेत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
संस्थेच्या अध्यक्षा स्मिता घैसास यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संस्थेच्या अंजली देशपांडे, दिव्या देशपांडे, प्रमोद गोऱ्हे, एन. डी. पाटील आदी यावेळी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
जया यांनी मादक द्रव्यांच्या वापराविरुद्ध जनजागृतीचे कार्य केले. लहान मुले आणि तरुणांमध्ये अंमली पदार्थ सेवनाविरोधात जागरूकतेचे काम केले. सध्या त्या सायंग जिल्ह्याच्या बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. या कार्यक्रमाचे युट्युबवर प्रक्षेपण करण्यात येणार आहे.