शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीत दोन धामण सापांच्या युद्ध प्रसंगाचा थरार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 20:58 IST

पुरंदर तालुक्यात जेजुरीजवळ खोमणे वस्ती येथे ज्ञानेश्वर खोमणे यांच्या घराशेजारी असलेल्या शेतात दोन धामण जातीच्या सापांच्या तुंबळ युध्दाचा दुर्मिळ दृश्य जेजुरीकरांना पाहायला मिळाले. 

ठळक मुद्देधामण जातीचे साप विषारी नसतात.

जेजुरी : पुरंदर तालुक्यात जेजुरीजवळ खोमणे वस्ती येथे ज्ञानेश्वर खोमणे यांच्या घराशेजारी असलेल्या शेतात दोन धामण जातीच्या सापांच्या तुंबळ युध्दाचा दुर्मिळ दृश्य जेजुरीकरांना पाहायला मिळाले. खोमणे कुटुंबीयांनी त्यानंतर सर्पतज्ञाला बोलावले. सर्पमित्र दत्तात्रय मुरकुटे यांनी  सापांना पकडून दूर निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले.  सर्पमित्र मुरकुटे यांनी या दृश्याचे वैशिष्ट्य सांगताना म्हणाले, हे दोन्ही धामण प्रकारातील नर जातीचे साप आहेत. ते एकमेकांशी युद्ध करताहेत. मात्र, एकमेकांना दुखापत किंवा चावा घेत नाही. केवळ एकमेकांची ताकद  तपासली जात असते. या युध्दात थकणारा सर्प शेवटी निघून जातो. विजयी दुसऱ्याशी याप्रकारचे युद्ध करण्यास तयार राहतो. साधारण मार्च महिन्यात सातत्याने अशी दृश्ये दिसतात. एप्रिल महिन्यात अशा युद्धातून विजयी सर्पाच्या सानिध्यात मादी येते. प्रजननाच्या दृष्टीने मिलन होते. पुढे मे महिन्यात मादी साधारणपणे १८ ते २२ अंडी घालते. त्यानंतर ६५ ते ७० दिवसानंतर अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. धामण जातीचे साप विषारी नसतात. उलट ते शेतकऱ्यांचे मित्र म्हणून ओळखले जातात. शेतातील उंदीर खाण्यास ते एक्सपर्ट असल्याचे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन व रिसर्च सातारा संस्थेचे वन्यजीव अभ्यासक मुरकुटे यांनी सांगितले.

टॅग्स :JejuriजेजुरीPurandarपुरंदर