शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

साप-मांजराची लढाई; दोघांचाही रोहित्रात करुण अंत

By admin | Updated: November 18, 2016 06:05 IST

साप आणि मुंगसाचे वैर आपल्याला ज्ञात आहे... तसेच मांजराचे आणि सापाचेदेखील वैर असते... आज कऱ्हा नदीलगत हे वैरत्व नागरिकांनी अनुभवले.

बारामती :  साप आणि मुंगसाचे वैर आपल्याला ज्ञात आहे... तसेच मांजराचे आणि सापाचेदेखील वैर असते... आज कऱ्हा नदीलगत हे वैरत्व नागरिकांनी अनुभवले. स्मशानभूमीच्या रस्त्याने धामण जातीचा साप सुसाट पळत होता. त्यामागे मांजर धावत होते. अखेर त्याला रस्त्यालगत असलेल्या विद्युत रोहित्राची पेटी दिसली. साप सरळ त्या पेटीमध्ये घुसला. त्याचा पिच्छा सोडायचा नाही, असा चंगच मांजराने बांधला. पेटीचा उघडा दरवाजा दिसला, त्यात त्याने उडी मारली. मात्र, वीजप्रवाह सुरू असल्याने साप आणि मांजराचा अंत झाला. वैराला प्रेमाने जिंकता येते, असे म्हटले जाते. मात्र, काही प्राण्यांचे वैर असे टोकाचे असते. कऱ्हा नदीच्या पात्रातून बाहेरच्या दिशेने मांजराने त्या सापाचा पाठलाग केला. त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी साप काही वेळा जागेवर थांबून त्याच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, मांजर त्यापेक्षा सरस ठरत होते. त्यामुळे सापाने थेट सुसाट पळ काढला. अचानक काही जणांचे या दोघांच्या लढाईकडे लक्ष गेले. साधारण ५ ते १० मिनिटे ही लढाई सुरू होती. अखेर साप रस्त्यालगत असलेल्या विद्युत रोहित्राच्या पेटीत घुसला. मांजराने पेटीत साप घुसल्याचे पाहिले. मांजराने सापाच्या मागे पेटीत उडी मारली. साप वीजप्रवाह सुरू असलेल्या तारेत अडकला. त्याचबरोबर मांजरालादेखील वीजप्रवाहाचा धक्का बसला. दोघेही तेथेच गतप्राण झाले. त्यांची लढाई पाहण्यासाठी गर्दी केलेल्यांनी त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला; मात्र वीजप्रवाह सुरू असल्यामुळे काही करता आले नाही. या गर्दीत असलेल्या पोपट खरात या नागरिकाने सावधानता बाळगली. लहान मुलेदेखील ही लढाई पाहण्यासाठी आले होते. विजेच्या प्रवाहाने मुलांना धोका होऊ नये, यासाठी त्यांनी काळजी घेतली. काही ओळखीच्या तरुणांना बोलावले. सुजित रणदिवे आणि त्यांच्यासमवेत असलेल्या तरुण वायरमनला घेऊन आले. तेथील वीजप्रवाह बंद करण्यात आला. मात्र, उपस्थित असलेल्या नागरिकांनी दोघांच्या करुण अंताबाबत हळहळ व्यक्त केली.