शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

बसचालकांना नियमांचे वावडे, शिस्तीचा बडगाही ठरतोय निष्फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 03:29 IST

वाहतुकीचे नियम तोडण्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) बसचालकही मागे नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : वाहतुकीचे नियम तोडण्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) बसचालकही मागे नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. अनेक बसचालकांकडून भरधाव वेगाने बस दामटणे, झेब्रा क्रॉसिंगवर थांबविणे, सिग्नल तोडणे, बस चालविताना मोबाईलवर बोलणे असे प्रकार घडत आहेत. पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी शिस्तीचा बडगा उगारूनही अनेक चालकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.शहरातील वाहतूक व्यवस्थेचे अनेक प्रश्न आहेत. वाहतूक पोलीस, पालिका प्रशासनाकडून ही स्थिती सुधारण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जातात. पण अनेक बेशिस्त वाहनचालकांमुळे या प्रयत्नांना खीळ बसते. वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करणाºया वाहनचालकांमुळे शहरातील वाहतुकीची समस्या आणखीच जटिल होत चालली आहे. त्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या ‘पीएमपी’मधील अनेक चालकांकडूनही भर घातली जात आहे. बेदरकारपणे बस चालवणाºया चालकांवर कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष करून अनेक चालक पूर्वीप्रमाणेच नियमांचे उल्लंघन करत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले.स्वारगेट, महापालिका, कर्वे रस्ता, शिवाजीनगर भागांतील काही प्रमुख चौकांमध्ये पाहणी करण्यात आली. सिग्नलवर काही बसचालक झेब्रा क्रॉसिंगवर येऊन थांबत होते. तसेच लाल दिवा लागण्यापूर्वीच बस थोडी-थोडी पुढे नेण्याची घाई केली जात होती. काही चालक लाल दिवा लागल्यानंतरही वेगात बस दामटताना दिसले. पिवळा दिवा हा वाहनाचा वेग कमी करून थांबण्याचा इशारा देणारा असतो. पण बसचालकांकडून तो जाण्याचा सिग्नल समजून त्याकडे दुर्लक्ष करत होते.लांबूनच हिरवा दिवा दिसल्यानंतर लाल दिवा लागण्यापूर्वी बस सिग्नलच्या पुढे नेण्याच्या उद्देशाने बसचा वेग वाढविणारे चालकही पाहायला मिळाले. काही चालकांकडून सिग्नलवर पुढे उभ्या असलेल्या वाहनचालकांना सिग्नल तोडण्यासाठी रेस वाढवून इशारा दिला जात असल्याचेही आढळून आले.चालकांना कारवाईची भीतीचालकांनी नेमून दिलेल्या फेºया वेळेमध्ये पार न पडल्यास तसेच अपुºया केल्यास संबंधित चालक-वाहकांचे वेतनकपात करण्याच्या सूचना मुंढे यांनी सर्व आगार व्यवस्थापकांना दिल्या आहेत. त्यामुळे चालक-वाहकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.याविषयी बोलताना काही चालक म्हणाले, ‘कामाच्या वेळेवर उपस्थित राहूनही तसेच बिघाड झालेल्या बस वेळेत दुरुस्त होत नसल्याकारणाने नियोजित बस ताब्यात घेण्यासाठी तासन्तास ताटकळत बसावे लागते. बस वेळेवर ताब्यात न मिळाल्याने त्यांचा परिणाम फेºयांच्या वेळापत्रकावर पडतो. त्यामुळे काही चालक वेळेत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत असतात.तुकाराम मुंढेयांचे आदेश...नियोजनापेक्षा ५० टक्केपर्यंत कमी फेºया पूर्ण केल्यास चालक, वाहकांचे त्या दिवशीचे अर्धे वेतन कपात करण्यात यावे. तसेच ज्या दिवशी ५० टक्केपेक्षा जास्त परंतु १०० टक्के फेºया पूर्ण केल्या जाणार नाहीत, त्या दिवशी संबंधित चालक व वाहकाचे एक दिवसाचे पूर्ण वेतन कपात करण्यात येईल. ज्या चालकांकडून बेदरकारपणे बस चालवून प्रवाशांच्या जीवितावर धोका निर्माण होईल, असे वर्तन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.प्रवाशांच्या सुरक्षा, प्रशासनाचा दबाव, वाहतूककोंडी, बेशिस्त वाहनचालक या सर्वांवर मात करून चालकांना बस वेळेत न्यावी लागते. याला तोंडदेताना प्रत्येक मिनिटासाठी चालकांना झगडावे लागतआहे. त्यामध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होते.टीम लोकमत : राजानंद मोरे, गायत्री श्रीगोंदेकर, वृषाली केदार,राहुल दळवी, वेंकटी धुळगंडे, रजत खामकर

टॅग्स :Puneपुणे